Headlines

संभाजीनगरात तलाठी नियुक्तीची बोगस ऑर्डर देत 42 लाखांचा गंडा:उमेदवारांना चक्क ट्रेनिंगही दिले, दोघांविरोधात गुन्हा दाखल

निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून बनावट ओळखपत्रे, टॅब, तसेच तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीच्या पत्रांआधारे तलाठी पदावर नियुक्ती आदेश देत दोघांकडून तब्बल ४१ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. हा प्रकार तहसील कार्यालयात २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्ट दरम्यान घडला. या प्रकरणी बाळासाहेब हरबक आणि त्याच्या एका साथीदारावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा…

Read More

बहिणींची नवी ‘ग्रीन’ बांधिलकी; " सीड' राख्यांना पसंती:विविध प्रकारच्या राख्या खरेदीची माळीवाडा, कापड बाजार, प्रोफेसर कॉलनी चौकात लगबग‎

भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा नवा ट्रेंड यंदाच्या रक्षाबंधनात दिसून येत आहे. अहिल्यानगरच्या बाजारपेठेत ‘सीड राखी’ अर्थात बियाणे असलेल्या पर्यावरणपूरक राख्यांना तरुणाईकडून पसंती मिळत आहे. राखीचा सण संपल्यानंतरही तिच्या माध्यमातून रोपटे उगवावे, हा सामाजिक संदेश या राख्यांतून दिला जात आहे. येत्या २८ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने शहरातील माळीवाडा, कापड बाजार, प्रोफेसर कॉलनी…

Read More

करमाळ्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा:शिवसेनेने दिले डीवायएसपी,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, आणि पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन‎

करमाळा तालुका आणि शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, मुलींच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व खासगी शैक्षणिक क्लासेसमध्ये आणि किल्ला विभाग परिसरातील प्रमुख रस्त्यांवर तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली. करमाळा…

Read More

महाराष्ट्रात नराधमांना राजकीय पाठबळ:मोदी पुढचे 7 ते 8 महिनेच पंतप्रधान राहतील, शहा सुद्धा त्यांच्यासोबतच जातील- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील 7 ते 8 महिनेच पंतप्रधान असतील, या मुद्द्यावर माझे आणि राहुल गांधी यांचे एकमत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी हेच सांगत आहे. ते त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत; त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हे पद सोडावे लागणार आहे. 17 सप्टेंबर रोजी हे सर्व काही तुम्हाला कळेल; तो पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा…

Read More

राज्यात पावसाचा 'ब्रेक' कायम:मराठवाड्यात पावसाची मोठी तूट; पण 4 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, विजांसह वादळी सरींचा अंदाज

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिली असून पावसाचा जोर सध्या कमकुवत झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेश आणि बिहारकडे सरकल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. असे असले तरी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसासाठी पोषक हवामान तयार…

Read More

वैरागच्या यात्रेत यंदा घुंगराचा आवाज नाही; समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर:संतनाथ महाराज यात्रेनिमित्त वैराग पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक‎

येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली श्री संतनाथ महाराज यांची यात्रा दि. २३ ते २८ ऑगस्टपर्यंत आहे .यात्रेच्या पार्श्वभूमीवर वैराग पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक बुधवारी रात्री सात वाजता संपन्न झाली. यामध्ये यात्रेमधील नियोजनाविषयी चर्चा झाली. . या बैठकीमध्ये श्री संतनाथ महाराज देवस्थान समितीचे प्रमुख ,तसेच भंडारा कमिटी, यात्रेतील प्रमुख प्रतापराव निंबाळकर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी…

Read More

मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त:खासदार बळवंत वानखडे यांनी घेतली रुग्णालयात भेट, दोषींवर कारवाईचे दिले निर्देश‎

येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, चक्करसारखी लक्षणे जाणवल्याने त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधाच झाल्याचा संशय खासदार बळवंतराव वानखडे यांनीही व्यक्त केला असून, बुधवारी रुग्णालयात पोहोचून त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. भेटीदरम्यान खासदार वानखडेंनी विद्यार्थ्यांच्या…

Read More

धनगर समाजाने आरक्षणासाठी लढा द्यावा- प्रा. अंजली आंबेडकर:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी, समाजातील गुणवंतांचा गुणगौरव‎

धनगर समाजाने आपली ताकद दाखवल्याशिवाय धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही. धनगर समाज महाराष्ट्रभर एकत्र आला तर आरक्षण मिळण्यासाठी एक दिवस सुद्धा लागणार नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी तथा धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त, नवनियुक्त तसेच पदोन्नती प्राप्त समाज बांधवांचा सत्कार सोहळा आयोजित…

Read More

सरासरीच्या 66.2 टक्केच पाऊस; जिल्ह्यात 202.30 मिमी.ची तूट:15 दिवसांपासून दडी; बळीराजा चिंताग्रस्त, व्यापाराला फटका‎

जिल्ह्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर अवर्षणाचे सावट गडद झाले. दहा वर्षाचे आकडे पाहिले तर १८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ५९८ मिमी पाऊस पडायला हवा होता. प्रत्यक्षात मात्र तो २०२.३० मिमीने कमी असून, ३९५.७० मिमीवरच थांबला आहे. वाढीच्या काळातच पावसाने ताण दिल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पिके सुकत आहेत. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतीसह ग्रामीण, शहरी…

Read More

जिल्ह्यात 1033 गावांसाठी 91 पर्जन्यमापक केंद्र:पावसाच्या अर्धवट नोंदीचा बसतो फटका, पीक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्याबरोबर योजनांचा लाभ घेण्यातही अडचणी‎

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने दडी मारली आहे. माळरानावरील खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. जिल्ह्यात असमान पाऊस पडतो. पावसाची नोंद मंडळनिहाय होते. मंडळात असलेल्या काही गावांमध्ये मोठा पाऊस तर काही ठिकाणी कोरडेठाक हवामान असते. जिल्ह्यातील १०३३ ग् . त्यामुळे योग्य पद्धतीने पावसाचे मोजमाप होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा, पीक विम्याचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत….

Read More