Headlines

जिल्ह्यात 1033 गावांसाठी 91 पर्जन्यमापक केंद्र:पावसाच्या अर्धवट नोंदीचा बसतो फटका, पीक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्याबरोबर योजनांचा लाभ घेण्यातही अडचणी‎

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने दडी मारली आहे. माळरानावरील खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. जिल्ह्यात असमान पाऊस पडतो. पावसाची नोंद मंडळनिहाय होते. मंडळात असलेल्या काही गावांमध्ये मोठा पाऊस तर काही ठिकाणी कोरडेठाक हवामान असते. जिल्ह्यातील १०३३ ग् . त्यामुळे योग्य पद्धतीने पावसाचे मोजमाप होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा, पीक विम्याचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत….

Read More

नालेगावच्या आखाड्यात कुस्तीचा थरार; सोलापूर येथील माऊली कोकाटे विजेता:कुस्तीप्रेमींची तुफान गर्दी, प्रेक्षकांच्या कडकडाटात पटकावली मानाची गदा‎

शहरातील सीना नदीकाठी असलेल्या श्री वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागपंचमीनिमित्त भरलेल्या यात्रेच्या उत्साहात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने हिंदुत्व प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्यावतीने नगरसेवक महेश लोंढे यांच्या पुढाकारातून झालेल्या या कुस्ती मैदानात राज्यभरातील नामवंत कुस्तीपटूंनी सहभाग घेत लाल मातीच्या आखाड्यात आपल्या कुस्ती कौशल्याचे दर्शन घडविले. तोडीस तोड कुस्तीपटू आमनेसामने…

Read More

बस-ट्रकची धडक; दाेन महिला ठार, 31 जखमी‎:चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर अपघात; मृत महिला एरंडाेल, जामनेरच्या; बसचा चक्काचूर‎

मालेगाव -चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाट्यावर बस व ट्रकची समोरसमोर भीषण धडक झाली. बुधवारी सकाळी दहा वाजता झालेल्या अपघातात इर्शादबी रमजान मणियार (७०, रा. जामनेर) व रखूबाई पिरन माळी (६५, रा. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक, बस चालक व वाहकासह ३२ जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या कडेला…

Read More

चांदवडमध्ये शिक्षकांची 108 पदे रिक्त, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान:जागा न भरल्यास विद्यार्थ्यांसह जनआंदोलन; संजय जाधव यांचा निवेदनाद्वारे इशारा‎

. तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची १०८ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुख्याध्यापकांची १२, पदवीधर शिक्षकांची ४३ आणि प्राथमिक शिक्षकांची ५३ पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या बदल्या व सेवानिवृत्तीमुळे निर्माण झालेली ही रिक्त पदे त्वरित भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक…

Read More

महापालिकेची कारवाई:देवळाईत 40 एकरांवरील अनधिकृत प्लॉटिंग उद्ध्वस्त; डेव्हलपर्सचे कार्यालय पाडले, पाच वर्षांपासून सुरू होती प्लॉटिंग; 450 प्लॉटचे मार्किंग उखडले

सोलापूर-धुळे महामार्गावरील देवळाई (सातारा परिसर) येथे 35 ते 40 एकर जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत ले-आऊट मनपाने बुधवारी (19 ऑगस्ट) उद्ध्वस्त केले. जयशंकर डेव्हलपर्सने कोणतीही एनए किंवा अधिकृत परवानगी नसताना येथे श्री साईनगर नावाने बेकायदा प्लॉट पाडले होते. मनपाच्या अतिक्रमण विभागाने महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशान्वये कारवाई करत येथील 450 प्लॉटच्या मार्किंग, विकासकाचे…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कर्जमाफीसाठी ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांची समितीद्वारे पडताळणी, ‘आधार’चे प्रमाणीकरण होणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण रखडलेल्या राज्यातील ३.१८ लाख शेतकऱ्यांसाठी सहकार आयुक्त कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, अशा प्रकरणांत आता आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा ठसा घेऊन तालुकास्तरीय समितीमार्फत पडताळणी केली जाणार आहे. या नव्या कार्यपद्धतीमुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला…

Read More

आईची 15 दिवसांच्या चिमुकल्यासह त्रिवेणी तलावात आत्महत्या:वडील म्हणाले, तापामुळे ती काही दिवसांपासून बडबडत होती

मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पूजा प्रवीण डाहे या विवाहित महिलेने आपल्या १५ दिवसांच्या चिमुकल्यासह गावाजवळील त्रिवेणी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली असून, बुधवारी सकाळी उघडकीस आली. मृत पूजा डाहे या दर्यापूर तालुक्यातील सांगवा येथील रहिवासी होत्या. प्रसूतीसाठी त्या अंबाडा येथील आपल्या माहेरी आल्या…

Read More

'सुनील तटकरेंकडे असा कोणता जादूटोणा आहे?':रायगडच्या पालकमंत्रिपदावरून रामदास कदम यांचा खोचक सवाल, काय म्हणाले कदम?

भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका करत महायुतीतील राजकीय समीकरणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कदम यांनी केलेल्या या रोखठोक वक्तव्यामुळे महायुतीत…

Read More

मेळघाटातील 5 विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय:खासदार वानखडेंनी घेतली भेट, चौकशीचे निर्देश; प्रकृती स्थिर

अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि चक्कर येण्याची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला आहे. खासदार वानखडे यांनी बुधवारी रुग्णालयात जाऊन संबंधित विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची…

Read More

अमरावतीत सरासरीपेक्षा 66.2 टक्के कमी पाऊस:15 दिवसांपासून दडी, 202.30 मिमी.ची तूट; शेतकरी चिंतेत

अमरावती जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अवर्षणाचे सावट गडद झाले आहे. १८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५९८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ ३९५.७० मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामुळे २०२.३० मिलीमीटर पावसाची तूट निर्माण झाली असून, ही सरासरीच्या ६६.२ टक्के आहे. पावसाच्या या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या मुख्य पिकांची वाढ खुंटली…

Read More