Headlines

'गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार':जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान, कॉंग्रेसचा वस्त्र काढून उघडे पाडण्याचा इशारा

महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू निलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधान केल्याचा…

Read More

शिक्षण हेच यशाचे खरे साधन, नगराध्यक्ष गायगोलेंचे प्रतिपादन:ओतारी समाज संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; पालकांचाही सत्कार

अंजनगाव सुर्जी येथे ओतारी समाज संघाच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी ‘शिक्षण हेच यशाचे खरे साधन असून, सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते,’ असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन तराळे होते. जळगावचे माजी अध्यक्ष दीपक कंडारे, राजेश तायवाडे…

Read More

परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक:बुधवारी कार्यक्रम जाहीर होणार, संचालकांच्या 21 जागांसाठी निवडणूक

परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी ता. १७ जाहीर होणार असून संचालकांच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या निवडणूकीमुळे सहकार क्षेत्राचे वातावरण तापणार आहे. परभणी व हिंगोली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांचा निवडणूकीचा कार्यक्रम बुधवारी प्रसिद्ध होणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक…

Read More

'महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणा'ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी:असे धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य, मंत्री आशिष शेलारांची माहिती

राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणाला’ नुकतीच मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने राज्याच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने हे धोरण तयार केले आहे. अशा प्रकारचे सर्वंकष…

Read More

सातारा-सांगली विधानपरिषद:महायुतीतील वादावर पडदा! एकही मत फुटता कामा नये, एकनाथ शिंदेंचा शंभुराज देसाईंना आदेश

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस अखेर संपुष्टात आली आहे. शिवसेनेचे सर्व मतदार महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मतदान करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. “शिवसेनेचे एकही मत फुटू नये आणि प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवाराच्याच पारड्यात पडले पाहिजे,” असे थेट आणि कडक…

Read More

कर्जमुक्तीसाठी सरकारविरोधात संतापाचा उद्रेक!:आंदोलक शेतकऱ्याने दुचाकी पेटवली; नेत्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, या कर्जमाफीत लादण्यात आलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याच आरोप केला जात आहे. कोणत्याही अटीविना ‘सरसकट कर्जमाफी’ मिळावी, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनांचे लोण पसरत असून, वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे एका संतप्त शेतकऱ्याने शासनाचा निषेध करत भररस्त्यात स्वतःची दुचाकी…

Read More

राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय:नागपुरात 'सायक्लोट्रॉन प्रकल्प'; ग्रामीण पेयजल आणि ड्रोन निर्मितीच्या नवीन धोरणांना मंजुरी!

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत वैद्यकीय क्षेत्र, ग्रामीण पाणीपुरवठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना दिलासा देणारे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत. नागपुरातील हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पासह ‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ आणि ‘ड्रोन-रोबोटिक्स’ निर्मितीला चालना देणारे स्वयंचलित प्रणाली धोरण जाहीर करण्यात आले आहे. नागपुरात…

Read More

नाशिक जिल्ह्यामध्ये प्रेयसीचे 2 भाऊ अन् मेव्हण्याकडून प्रियकराचा खून:3 अटकेत, संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न

तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एकाच समाजातील २५ वर्षीय तरुणाचा त्याच्या प्रेयसीचे २ भाऊ आणि मेव्हण्याने सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने छातीवर वार करत खून केला. या वेळी तिन्ही भावांना गावातील नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर संशयित आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता संतप्त नातेवाइकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न…

Read More

एअरफोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार:धर्मपरिवर्तनाचाही प्रयत्न झाला; व्हिडिओमध्ये रडत म्हणाली- मला सोडून द्या

नागपूरमध्ये भारतीय वायुसेना (IAF) च्या एका अधिकाऱ्याच्या 24 वर्षीय पत्नीवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. मुख्य आरोपी अयाज ताज मदारे हा तिचा शाळेतील जुना वर्गमित्र आहे. पीडितेनुसार, अयाज तिच्यावर धार्मिक मंत्रांशी संबंधित विधी करत असे. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करत असे. धर्मांतराशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये अयाज तिचे…

Read More

अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय:'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' मालिका नव्या प्लॅटफॉर्मवर; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येणार?

मराठी छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. व्यावसायिक टीआरपीचे कारण पुढे करत स्टार प्रवाह वाहिनीने ही मालिका अवघ्या 152 भागांमध्येच अचानक गुंडाळल्यामुळे प्रेक्षक, कलाकार आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत होता. मात्र, ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत या मालिकेचे निर्माते…

Read More