अस्मितेच्या संघर्षाची 4 दशके:दुबईचा व्यापारी बनून कर्नाटकात शिरले, बेळगावात आंदोलन; भुजबळांनी जागवल्या सीमा लढ्याच्या आठवणी
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज ४ जून १९८६ रोजी सीमाप्रश्नावरून कर्नाटकच्या बेळगावमध्ये केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा दिला. छगन भुजबळ शिवसेनेत असताना मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात लढा पुकारला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. या लढ्याला आज ४० वर्षे पूर्ण होत…