Headlines

भराडीच्या ज्ञानविकास विद्यालयात भारतीय वायुदलातील संधींवर ऑनलाइन मार्गदर्शन:पुण्याच्या लोहेगाव एअर फोर्स स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद‎

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त, साहस आणि जबाबदारीची भावना निर्माण व्हावी तसेच त्यांना भारतीय वायुदलातील रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात भारतीय वायुदलातील करिअरच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्श . या ऑनलाईन सत्रात लोहेगाव (पुणे) एअर फोर्स स्टेशनच्या फ्लाईंग ऑफिसर मुस्कान सिंह (फ्लायंग पायलट) आणि मास्टर वॉरंट ऑफिसर देवेश कुमार (एज्युकेशन इन्स्ट्रक्टर) यांनी…

Read More

टोलनाक्यावर वाद सोडवण्यास आलेल्या‎पोलिस कर्मचाऱ्यास तरुणांकडून मारहाण‎:माळीवाडी टोलनाक्यावरील घटना, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू

टोलनाक्यावर वाद झाल्याची माहिती ११२ या क्रमांकावर मिळाली होती. त्या ठिकाणी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना अंबड तालुक्यातील माळीवाडी टोलनाक्यावर २२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आसिफ कय्युम शेख (पाचोड) याच्यासह तीन अनोळखींवर गुन्हा दाखल आहे. अंमलदार पवन बळीराम चव्हाण (३२) यांनी अंबड ठाण्यात तक्रार दिली आहे. टोलनाका परिसरात ५० ते…

Read More

संवाद:संविधानामुळे कोणताही तरुण मुख्यमंत्री होऊ शकतो- फडणवीस, तरुणांनी केवळ प्रेक्षक न राहता देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे

राजकीय आणि सामाजिक वर्तुळात कायमच चर्चेत राहणाऱ्या ‘मंथन फॉर यूथ’ या विशेष कार्यक्रमात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी केवळ राजकीय प्रवासावरच नव्हे, तर देशातील लोकशाही व्यवस्थेच्या खऱ्या आणि अफाट ताकदीवर मोठे भाष्य केले. आजच्या तरुण पिढीने देशाच्या जडणघडणीत कसे पुढे आले पाहिजे याचे महत्त्व त्यांनी या वेळी अधोरेखित केले….

Read More

पायाच्या असह्य वेदनेला कंटाळून:तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मोर्शी तालुक्यातील खेड येथे एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. आशिष दिगंबर मडावी असे मृत तरुणाचे नाव आहे. पायाच्या असह्य वेदनेला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष दिगंबर मडावी याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. वयाच्या २२…

Read More

श्री संत सावता माळी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा:महाविद्यालयाच्या विकासात योगदान देण्याचा माजी विद्यार्थ्यांचा संकल्प

फुलंब्री येथील श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला. पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचलित या महाविद्यालयात रविवारी (२३ ऑगस्ट) रोजी माजी विद्यार्थ्यांची बैठक व एकत्रीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य डॉ. सुभाष टकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. महेश थोरात, प्रा. डॉ. नितीन माळेगावकर,…

Read More

श्रावणात नांदगावचे श्री खंडेश्वर मंदिर भाविकांनी फुलले:सोमवारी हजारो भाविकांची गर्दी; हेमाडपंथी मंदिरात भक्तिमय वातावरण

श्रावण महिना सुरू होताच नांदगाव खंडेश्वर येथील साडेआठशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री खंडेश्वर (महादेव) मंदिर भाविकांनी गजबजून गेले आहे. श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. नांदगाव खंडेश्वरसह अमरावती जिल्हा, विदर्भातील विविध भाग तसेच मध्य प्रदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत. अमरावतीपासून सुमारे ३५…

Read More

अमरावती, तिवसात 25 दिवसांनी पावसाचे पुनरागमन:वातावरणात गारवा; पिकांनाही दिलासा

अमरावती जिल्ह्यात २५ दिवसांच्या दीर्घ खंडानंतर पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दुपारी अमरावतीत तर शनिवारी रात्री तिवसा तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पिकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात पाऊस झाला होता, त्यानंतर पावसाने पूर्णपणे ओढ दिली होती. या काळात शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन, कापूस आणि…

Read More

माजी नगरसेवक शेडगेला आत्महत्या प्रकरणात दिलासा:उच्च न्यायालयाचे पुढील सुनावणीपर्यंत सक्तीची कारवाई न करण्याचे निर्देश

गुलटेकडी येथील बांधकाम कंत्राटदार खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत शेडगे यांच्याविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश न्यायमूर्ती माधव जामदार यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे. या गुन्ह्यात बाळा शेडगे यांनी उच्च न्यायालयात…

Read More

नागपुरात 4 हजार तरुणांनी ढोल-ताशा वादनाचा विश्वविक्रम केला:एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद; 585 ध्वजधारकांचा सहभाग

नागपूरमध्ये रविवारी ढोल-ताशा वादनाचा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४ हजारांहून अधिक तरुण-तरुणींनी एकत्र येऊन ढोल आणि ताशा वाजवले. या भव्य सांस्कृतिक महासंगमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये अधिकृतपणे नोंद झाली आहे. हा विक्रम ‘जेनझी संवाद’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला होता. विदर्भातील विविध शहरांमधून २०० हून अधिक ढोल-ताशा पथकांना एकाच…

Read More

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नागपुरात पार्थिव शिवलिंग निर्मिती:मानकापूरमधील सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती, 91 लाखांचा संकल्प

नागपूरच्या मानकापूर येथे आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला. त्यांनी स्वतः मातीची शिवलिंगे तयार करून महादेवाचे दर्शन घेतले. या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. मानकापूर येथील शिवमंदिर परिसरात हा भव्य उपक्रम तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आला आहे. १३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत चालणाऱ्या या महिनाभराच्या सोहळ्यात यंदा ९१…

Read More