Headlines

वेरूळमध्ये श्रावणाचा पहिला दिवस ठरला वाहतूक कोंडीचा:10 हजार भाविकांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन‎

पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी १२ वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर आणि वेरूळ-खुलताबाद मार्गावर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका भाविकांना बसला. अपुऱ्या सुविधा आणि वाहतूक कोंडीमुळे यंदा पहिल्या दिवशी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षी योग्य नियोजनामुळे पहिल्या श्रावणी सोमवारी ३५ हजार भाविकांनी सुलभ दर्शन घेतले होते. मात्र, यावर्षी नियोजनाच्या अभावामुळे…

Read More

पुणे मनपा भरती घोटाळा:2 ते 15 लाखांत मनपात नोकरीचे आमिष, 150 जणांना बनावट नियुक्तिपत्र देत पगारही केले, नऊ जणांवर गुन्हा दाखल

पुणे मनपा व इतर मनपांत शिपाई ते अभियंता पदावर नोकरी लावून देतो, असे सांगून संबंधितांकडून 2 ते 15 लाखांपर्यंत पैसे घेण्यात आले. शिपाई ते अभियंता पदासाठी नोकरीची बनावट नियुक्तिपत्रे देण्यात आली. पुणे मनपाचे बनावट लेटरहेड, शिक्के यांचा वापर करून तरुणांची दिशाभूल करण्यात आली. खोट्या स्वाक्षरीद्वारे पुणे मनपाच्या खात्यातून उमेदवारांच्या बँक खात्यात पगारही जमा करण्यात आला….

Read More

उधारीवर गणवेश घेतले अन् सरकारने दिलेले 3.48 कोटी परत गेले:‘समग्र शिक्षा’ची मुदत 30 जून रोजी रात्री संपल्याचा परिणाम; उधारीत गणवेश घेणारे मुख्याध्यापक अडचणीत

समग्र शिक्षा अभियान योजनेची मुदत संपल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशासाठी सरकारकडून आलेला ३ कोटी ४८ लाख ८५ हजार निधी परत गेला आहे. निधी येण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशासाठी शाळांनी पैसे खर्च केले. त्यातून विद्यार्थ्यांना पहिला गणवेश दि . जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समग्र शिक्षा योजनेंतर्गत निधी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या संयुक्त खात्यात येतो. प्रशासनाच्या आदेशानुसार मुख्याध्यापकांनी…

Read More

राज्यात SIR मध्ये 63.61 लाख मतदारांचा शोध लागेना:71.95 लाख मतदार कायमस्वरुपी स्थलांतरीत, मतदारांच्या शोधासाठी राजकीय पक्षांना साकडे

राज्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुुरू असलेल्या मतदार यादींच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून ६३.६१ लाख मतदारांचा अद्यापही शोध लागलाच नाही. आता या मतदारांच्या शोधासाठी निवडणूक विभागाने राजकीय पक्षांना साकडे घातले आहे. राज्यात एकूण ९.७८ कोटी मतदार आहेत. त्यापैकी आजपर्यंत ७.६२ कोटी मतदारांचे म्हणजेच ७७.९७ टक्के मतदारांचे मतदारांचे गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह…

Read More

रामराजेंच्या सूचक स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण:‘वजीर-घोडे गेले, नवीन प्यादी इनकमिंग’ म्हणत नेमका इशारा कुणाला?

महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका सूचक सोशल मीडिया स्टेटसमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय चर्चांना चांगलाच वेग आला आहे. “As long as the king stands, the game is alive” असे वाक्य शेअर करत त्यांनी ‘वजीर घोडे गेले, नवीन प्यादी इनकमिंग सुरू झाले आहेत’ असा मजकूर पोस्ट केला आहे. त्यामुळे रामराजेंच्या…

Read More

'ई-प्रमाण' सेवेचा राज्यभर शुभारंभ:मालमत्ता व विवाह नोंदणीची प्रमाणित कागदपत्रे आता घरबसल्या ऑनलाइन

राज्यातील नागरिकांना नोंदणीसंबंधित सेवा अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने ‘ई-प्रमाण’ या नव्या डिजिटल सेवेचा राज्यव्यापी शुभारंभ केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नोंदणी अभिलेखांचे डिजिटायझेशन आणि नोंदणी व मुद्रांक विभागातील विविध सेवांच्या सुलभीकरणाचाही शुभारंभ करण्यात आला. घरबसल्या मिळणार प्रमाणित कागदपत्रे या…

Read More

सांगलीतील रेवणसिद्ध घाटात भीषण अपघात:2 एसटी बसची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, 15 हून अधिक प्रवासी जखमी

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विटाजवळील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ ते १६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात कसा घडला? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात खानापूर तालुक्यातील विटाजवळील रेवणसिद्ध घाटात घडला. घाटातील…

Read More

विमानतळावर 'बॉम्ब'ची मस्करी पडली महागात!:एका वाक्यामुळे थांबवले विमानाचे उड्डाण, प्रवाशाला पोलिसांची नोटीस

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या खोडसाळपणामुळे मोठी खळबळ उडाली. दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात चढण्यापूर्वी सुरक्षा तपासणीदरम्यान ५५ वर्षीय प्रवाशाने “माझ्या बॅगेत बॉम्ब आहे” असे सांगितल्याने सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. या घटनेमुळे टेकऑफसाठी सज्ज असलेले विमान त्वरित थांबवण्यात आले आणि संपूर्ण सुरक्षा प्रक्रिया पुन्हा राबवण्यात आली. नेमका प्रकार कसा घडला? ही घटना…

Read More

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण:24 ऑगस्टपासून नाशिकमध्ये 10 दिवसीय शिबिर, संघटन बळकटीवर भर

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांसाठी नाशिक येथे २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी विशेष मार्गदर्शन करणार असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसह नव्या नेतृत्वाची जडणघडण करण्यावर भर दिला जाणार आहे. ‘संघटन सृजन अभियाना’अंतर्गत आयोजन अखिल भारतीय…

Read More

कुर्ला दरड दुर्घटना:मृतांचा आकडा 8 वर, तर 4 जणांची सुखरूप सुटका; बचावकार्य अखेर थांबले

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोध आणि बचाव मोहीम अखेर पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) गुरुवारी दुपारी १.२५ वाजता नागरी प्रशासनाशी समन्वय साधून मोहीम अधिकृतपणे बंद केली. या भीषण दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. शोधमोहीम पूर्ण दरड कोसळल्यानंतर एनडीआरएफ, मुंबई महापालिका…

Read More