Headlines

महान ते पातूर मार्गावरील पूल खचला; वाढला अपघाताचा धोका:चारही बाजूंना धोकादायक वळण अन् पाणी साचल्याने वाढला धोका‎

महान ते पातूर या २८ किलोमीटर अंतराच्या मुख्य मार्गावरील लोहगड, धाबा, जनुना, राजनखेड, शेलगावसह अनेक खेड्यांतील नागरिक व विद्यार्थ्यांची दररोज मोठी वर्दळ असते. मात्र, महान येथील हनुमान मंदिरासमोरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पूल खचल्याने या ठिकाणी भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे अर्धवट डांबरीकरण करण्यात आले, परंतू पुलाची साधी डागडुजीही…

Read More

विहिरीत पडून मायलेकीचा अंत:वांगी नं. 1 येथील घटना

करमाळा तालुक्यातील वांगी नं. १ येथे घराजवळील विहिरीत पडून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार दि. १४ रोजी दुपारी उघडकीस आली आहे. चिमुकली मुलगी विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर तिला वाचवण्यासाठी आईनेही विहिरीत उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, दोघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये शिल्पा सागर जाधव (वय २८) आणि ऋता…

Read More

यश मिळवणाऱ्या गुणवंतांना टाळ्यांनी सलाम करूया : जवणे:लोहार समाज गुणवंतांचा‎उद्या राहुरीत सन्मान सोहळा‎

लोहार यूथ फाउंडेशन, अहिल्यानगरतर्फे व समस्त लोहार समाजाच्या सहभागातून ‘विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१६ ऑगस्ट) राहुरी येथील शिवचिदंबर मंगल कार्यालय, बारागाव नांदूर रोड येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विद्यार्थी आणि समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योजक, तथा लोहार…

Read More

सैनिकांचे योगदान, ऋण कधीही फिटणार नाही:कळवणला आजी-माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्याधिकारी नागेश येवला यांचे प्रतिपादन‎

देशाच्या संरक्षणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या त्यागामुळेच सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत. सैनिकांच्या देशसेवेमुळे देश सुरक्षित असून, त्यांचे ऋण कधीही फिटणार नाही, असे प्रतिपादन मुख्याधिकारी नागेश येवला यांनी केले. रोटरी क्लब कळवणच्या वतीने आयोजित आजी-माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश पाखले, सेक्रेटरी नितीन संचेती…

Read More

लासलगाव:निफाड विठाई पोदार लर्न स्कूलला 128 पदकांसह सांघिक अजिंक्यपद

नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय ग्रॅपलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मातोश्री विठाई पोदार लर्न स्कूल, निफाडच्या १२८ खेळाडूंनी तब्बल १२८ पदकांची कमाई करत सांघिक अजिंक्यपदाचा प्रथम क्रमांक पटकावला. खेळाडूंनी ७० सुवर्ण, ३० रौप्य आणि २८ कांस्यपदके मिळवत स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला. स्पर्धेत विद्यालयाच्या प्रत्येक खेळाडूने जिद्द, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन केले. वैयक्तिक कामगिरीसोबतच सांघिक कामगिरीतही…

Read More

फर्दापूर‎:शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी भारतसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील वरखेडी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच पार पडली. या समितीच्या अध्यक्षपदी भारतसिंग ओंकारसिंग राजपूत तर उपाध्यक्षपदी मनोज रामचंद्र नवघरे यांची सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पालक सभेत विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शाळेच्या प्रगतीबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नव्या व्यवस्थापन…

Read More

निवेदन:कर्जमाफीच्या पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करा: आमदार चव्हाण

शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत पोर्टलवर उद्भवणाऱ्या विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशी मागणी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी केली. शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन या संदर्भात एक सविस्तर निवेदन सादर केले आणि कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार चव्हाण यांनी शेतकरी वर्गाला…

Read More

परसोडा येथे संत बहिणाबाई अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ:51 फूट उंच ध्वजाचे महंत रामगिरी महाराज, स्वामी शांतिगिरी महाराज, मधुसूदन महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण‎

वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान आयोजित संत बहिणाबाई महाराज संस्थानच्या ४७ व्या अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी संत, महंत आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. ४० एकरांच्या विस्तीर्ण परिसरात हा भव्य सोहळा होत असून, सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी…

Read More

"आमदार कैलास पाटील हे 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग":मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरे गटाला धक्के देण्याचे सत्र कायम ठेवले असून, नुकतेच सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडी ताज्या असतानाच, शिंदे गटाचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठे वक्तव्य करत राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास…

Read More

विद्यार्थिनीच्या व्यथेवर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता:थेट गावात पोहोचून एसटी बस सेवा केली सुरू

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील दुर्गम खेतापूर येथील एका विद्यार्थिनीने एसटी बसच्या समस्येबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओची दखल घेत नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने खेतापूर गावाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून तात्काळ खेतापूर ते नागपूर अशी एसटी बस सेवा सुरू केली. खेतापूर येथील विद्यार्थिनींना माध्यमिक शिक्षणासाठी ७ किलोमीटर दूर असलेल्या…

Read More