Headlines

कचऱ्याच्या डब्यात लपवले होते 6 कोटींचे 'ड्रग्स':'बार गर्ल'ला ठोकल्या बेड्या, तीन दिवस वॉच आणि पालिकेचा सर्व्हे असल्याचे भासवून कारवाई

कल्याण-टिटवाळा परिसरातील पद्मावती रॉयल सोसायटीमध्ये पोलिसांनी एखाद्या चित्रपटात शोभावा असा थरार रचत तब्बल ६ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, घराची झडती सुरू असताना आरोपी महिलेने हे अंमली पदार्थ कचऱ्याच्या डब्यात लपवले होते. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ती सुटू शकली नाही. याप्रकरणी अश्विनी पॉल या महिला पेडलरला अटक करण्यात आली असून, मोठ्या…

Read More

उष्माघाताने नाशिक, धुळ्यात दोघांचा मृत्यू:6 जिल्ह्यात पावसाची शक्यता

राज्यातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यांत गुरुवारी प्रचंड उष्णतेची लाट होती. हवामान विभागातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार १५ मे रोजी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यासह विदर्भात उष्णता कायम राहिल. उन्हात…

Read More

निरुपयोगी समजले जाणारे कॅक्टस शेतकऱ्यांचे ‘ब्लू गोल्ड’ बनले:मेक्सिकोमध्ये 1.4 लाख कोटी रुपयांचा टकिला उद्योग, यासाठी भारतीय शेतकरी कच्चा माल पाठवताहेत

भारतात एका काटेरी वाळवंटी वनस्पतीमुळे नवीन पेये उद्योगाचा जन्म झाला आहे. आंध्र प्रदेशातील कांदुकुरमध्ये बहुतेक शेतकरी आधी टोमॅटो, शेंगदाणे आणि मका पिकवत होते. 2010 मध्ये काही व्यापारी एगेव अमेरिकाना नावाच्या निवडुंगाच्या शोधात कांदुकुरला पोहोचले. शेतकरी याला निरुपयोगी समजून शेताच्या कुंपणासाठी लावत होते. बीबीसी वर्ल्डच्या अहवालानुसार, हाच एगेव निवडुंग मेक्सिकोच्या 1.4 लाख कोटी रुपयांच्या टकीला आणि…

Read More

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक महाराष्ट्राला कमकुवत करेल:मराठी अभ्यास केंद्राची लोकसभेत विधेयक रोखण्याची मागणी

महाराष्ट्राचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत रोखण्याची मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे. लोकसंख्या नियंत्रणामुळे राज्याच्या राजकीय प्रतिनिधित्वावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने, सर्व खासदारांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन केंद्राने केले आहे. मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य रोहित पाटील आणि सहसमन्वयक संदीप बर्वे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठीप्रेमी नागरिक, संस्था…

Read More

'जेन झी' पिढीवर संघाचा पूर्ण विश्वास:सुनील आंबेकर यांचे पुणे श्रमिक पत्रकार संघात प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ‘जेन झी’ (Gen Z) पिढीबद्दल संघ आशावादी असल्याचे म्हटले आहे. आजचे तरुण भारतीय परंपरा आणि गौरवाशी जोडले गेले असून, समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे योगदान देत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. या वार्तालाप प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष…

Read More

अंबादास दानवे कुणाच्या दबावाखाली टीका करतात?:मोहन भागवतांच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून उदय सामंतांचा सवाल

राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला अंबादास दानवे यांनी लावलेल्या उपस्थितीवर बोलताना सामंत म्हणाले की, दानवे संघावर सातत्याने टीका करतात, मात्र तिथे जाऊन त्यांनी सिद्ध केले आहे…

Read More

गर्भपात प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शिर्डीतून जेरबंद:15 हजारांच्या कमिशनसाठी साखळी सक्रिय

शहरातील रशीदपुरा भागात उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात रॅकेटमधील मुख्य एजंट मंगेश सुखदेव थोरात (वय ४०, रा. जटवाडा रोड) याला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (३० मे) बेड्या ठोकल्या. पोलिसांची कारवाई सुरू झाल्याचे समजताच तो शिर्डी येथे जाऊन लपला होता. महिलांना गर्भपातासाठी पोहोचवण्यासाठी तो तब्बल १५ हजार रुपये कमिशन घेत असल्याचे तपासात पुढे आले आहे. पैसे संपले…

Read More

चालक दारूच्या नशेत; प्रवाशांचा जीव टांगणीला‎:वाशिम-नालासोपारा एसटीचा 40 किलोमीटर थरार; अखेर बसच्या वाहकाने हाती घेतले स्टिअरिंग

वैजापूर चालक दारुच्या नशेत आणि बसमध्ये २५ प्रवासी. छत्रपती संभाजीनगर ते गारजपर्यंत ४० किलोमीटरचा जीवघेणा प्रवास वाशिमहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या एसटीतील प्रवाशांनी बुधवारी अनुभवला. बस सात ते आठ वेळा अपघातग्रस्त होता-होता वाचल्याचा दावा प्रवाशांनी केला. अखेर गारज परिसरानंतर वाहकाने स्टेअरिंग हाती घेत बस वैजापूरपर्यंत आणली. वाशिम-नालासोपारा एसटी (एमएच १४ एमएच ९८३६) दुपारी दोनऐवजी चार वाजता वैजापूर…

Read More

सुनेत्रा पवारांच्या निर्णयाची कसोटी:NCP मध्ये विधानपरिषदेसाठी रस्सीखेच; एक सीट, सहा इच्छुक, अंतर्गत स्पर्धा वाढली

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर आता राज्याचे लक्ष आगामी विधानपरिषद निवडणुकांकडे वळले आहे. येत्या 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्व पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या एकूण 10 जागांसाठी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय वातावरण तापले…

Read More

विद्यार्थ्यांनी संशोधनाची आवड जोपासणे आवश्यक:चांदवड येथे डॉ. चंद्रशेखर उपासनी यांचे आवाहन‎

‘भारतीय रसायनशास्त्राचे जनक’ आणि महान रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुल्लचंद्र (पी. सी.) रे यांनी ‘बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ या भारतातील पहिल्या औषध कंपनीची स्थापना करून भारतीय औषध उद्योगाचा पाया रचला व स्वदेशी उद्योगाला दिशा दिली. विज्ञान, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजसेवेच्या भावनेतून वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची आवड जोपासावी, असे आवाहन श्रीमान…

Read More