Headlines

काका आणि चुलत भावाशी 12 वर्षांपासून संबंध नाही!:माझ्या यशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न नको; स्वीडनच्या नवनिर्वाचित खासदार नीला विखे पाटलांचा सुजय विखेंवर पलटवार

स्वीडनच्या संसदेत नुकत्याच खासदार म्हणून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील आपल्या कुटुंबीयांच्या राजकीय वक्तव्यांवरून अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “महाराष्ट्रात आमचा खासदार पराभूत झाला असला, तरी विखे कुटुंबातील मुलगी स्वीडनमध्ये खासदार झाली,” असा दावा करणाऱ्या माजी खासदार सुजय विखे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी थेट तोफ…

Read More

औंढा नागनाथ मंदिर परिसरात 'FDA'चा मोठा छापा:उघड्यावरील 1 क्विंटल पेढा जप्त करून केला नष्ट

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथे येथे मंदिराच्या परिसरात उघड्यावर पेढा विक्री करणाऱ्या 7 दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून तब्बल 1 क्विंटल पेढा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे औंढ्यात एकच खळबळ उडाली आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दररोज सुमारे 5 ते 10 हजार भाविक…

Read More

मनमाडच्या दरगुडे स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा:विद्यार्थिनी स्वरा पगार हेड गर्ल, तर अनुज दराडे हेड बॉयपदी नियुक्त; चार हाऊसेस‌ची स्थापना‎

बी. जी. दरगुडे पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, जबाबदारीची जाणीव, संघभावना आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना विविध पदांची जबाबदारी सोपविण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शाळेची शिस्त, संस्कार व प्रतिष्ठा जपण्याचा संकल्प केला. नववीतील स्वरा पगार हिची हेड गर्ल, तर आठवीतील अनुज…

Read More

पहिल्या चार काठ्या तुम्ही झेला, पुढच्या आम्ही झेलू:बाधितांच्या लढ्याला बळ, शासनाचा अहंकार मोडून काढण्यासाठी एक व्हा, रोहित पवारांचा सरकारवर घणाघात‎

कोणतीही गरज नसताना आणि कुणाचीही मागणी नसताना होऊ घातलेला ‘नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग’ केवळ कमिशनसाठी रेटला जात आहे. उत्तर प्रदेशातील रस्त्यांच्या खर्चाशी तुलना केली, तर या महामार्गातून सरकारला किमान ४० हजार कोटी रुपये मिळणार आहेत. हा शासनाचा अहंका . २०२३ मध्ये ८०६ किमी लांबीच्या या रस्त्याचा खर्च ५७ हजार कोटी होता, तो आता १ लाख १…

Read More

Dnyanesh Kumar Resignation Demand; Left Parties Protest At Jantar Mantar

नवी दिल्ली17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्लीतील जंतर-मंतरजवळ शनिवारी AISA आणि डाव्या संघटनांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग केली. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यापूर्वी शुक्रवारी झालेल्या आंदोलनादरम्यान 1,000 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, काल मुंबईत CJP नेही SIR…

Read More

तमिळनाडू: महामार्गाच्या फलकावर हिंदी लिहिल्याने 2 अधिकारी निलंबित:तमिळ-इंग्रजीत ठिकाणांची नावे लिहिण्याचा नियम; 2026 मध्ये तिसऱ्यांदा हिंदी शब्द पुसले गेले

तमिळनाडू सरकारने शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गाच्या फलकांवर हिंदी लिहिल्याप्रकरणी दोन सहायक अभियंत्यांना निलंबित केले. हे प्रकरण तुत्तुकुडी जिल्ह्यातील सत्तानकुलम-नाझरेथ राज्य महामार्गाशी (SH-93) संबंधित आहे. येथे नव्या फलकांवर तमिळ आणि इंग्रजीसोबतच शहरांची नावे हिंदीतही लिहिण्यात आली होती. तमिळनाडू सरकारच्या मते, हे राज्याच्या द्विभाषिक धोरणाचे उल्लंघन आहे. हिंदी मजकूर हटवण्यासोबतच दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे….

Read More

दंड नाही तर थेट हार घालून स्वागत:हेल्मेट सक्तीसाठी अनोखी कारवाई

रस्ते सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी तिवसा येथील पंचवटी चौकात आरटीओ विभाग व तिवसा पोलिस प्रशासनाच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये…

Read More

ऑनलाइन नजरकैद:दहशतवाद्यांना फंडिंगचा धाक; वृद्धेस डिजिटल अरेस्ट करून 3.80 कोटी उकळले, नाशिक क्राइम ब्रँचचा तोतया अधिकारी बनून रचला कट

मोबाइल क्रमांकाचा गैरवापर करून मुंबईत बनावट बँक खाते उघडल्याचा आणि त्यातून थेट देशविघातक दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याचा खोटा आरोप ठेवून शहरातील एका उच्चवर्गीय ७५ वर्षांच्या वृद्धेला सायबर भामट्यांनी १४ दिवस ऑनलाइन नजरकैदेत (डिजिटल अरेस्ट) ठेवले. . पोलिस ठाण्याचा हुबेहूब सेटअप फिर्यादीला व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ कॉल केला. यात समोरील व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात बसलेली होती. तिच्या मागे तिरंगा…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवले:सातारा परिसरातील गट क्रमांक 4 मधील बुजवलेला नाला मोकळा

छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसर, गट क्रमांक ४ येथील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. अनिल सांगवी आणि अनिल संचेती यांनी सिमेंटचे पाईप टाकून आणि कंपाऊंड बांधून हा नाला पूर्णपणे बुजवला होता. या अतिक्रमणामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवून सुमारे १२०० मिमीचे पाईप टाकून नाला एका बाजूने प्रवाहित करण्यात आला होता. या अनधिकृत बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी…

Read More

देशात 90, महाराष्ट्रात 98% पाऊस; पण यंदा खंडही मोठे:नैऋत्य मान्सून येत्या 2 ते ३ दिवसांत केरळममध्ये; संभाजीनगरला वादळी पावसाचा तडाखा

देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नैऋत्य मान्सून येत्या २ ते ३ दिवसांत केरळमच्या मार्गे देशात प्रवेश करू शकतो. यंदा प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशभरात सरासरीपेक्षा कमी (९०%) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला तरी, महाराष्ट्रासाठी मात्र एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तब्बल ९८ टक्के पाऊस पडण्याची…

Read More