भेंडा उपकेंद्रासमोर शेतकऱ्यांचे धरणे:लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य; धरणे आंदोलन स्थगित
नेवासे तालुक्यातील भेंडा येथील वीज उपकेंद्रासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाचे धरणे आंदोलनात रूपांतर झाले. शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य करून उर्वरित मागण्या वरिष्ठ पातळीवर सोडविण्याचे आश्वासन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मागण्या लेखी स्वरूपात देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. शासनाच्या नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे जाहीर करण्यात आले…