Headlines

होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधी द्या- मा.आ. स्नेहलता कोल्हे

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात कोल्हे यांनी म्हटले आहे की, श्रीक्षेत्र पुणतांबा हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून येथे गोदावरी नदी उत्तरवाहिनी होत असल्याने…

Read More

उत्सवांचा खर्च वाचवून दुष्काळग्रस्तांना मदत करा:नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भावनिक आवाहन

राज्यात यंदा पावसाने दगा दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे हाताशी आलेली पिके करपून गेली असून, हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा संकटकाळात आपला अन्नदाता बळीराजा दुष्काळाच्या या भीषण परिस्थितीशी दोन हात करत असताना, आगामी नवरात्रोत्सव आणि इतर सर्व सण-उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करा आणि उत्सवाचा खर्च वाचवून तो निधी शेतकऱ्यांच्या…

Read More

सातारा गुन्हेगारी वृत्त:प्रेमविवाहानंतरच्या छळातून युवकाची आत्महत्या दहा जणांवर गुन्हा

प्रेमविवाह केल्यानंतर सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात एका युवकाच्या आत्महत्येनंतर दहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दहिगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील किरण महादेव ढवळे (३५) यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना घडली. त्यांच्या बहिणी शितल ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रेमविवाहाचा…

Read More

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून 10 जुलैपर्यंत चालेल:शेतकरी कर्जमाफी अटींवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी

महाराष्ट्र विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै दरम्यान होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या ३ आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येणार असल्याने राजकी . गेल्या ६ वर्षांत कधी अवघ्या ६ दिवसांचे, तर कधी ३ आठवड्यांपर्यंत चाललेल्या अधिवेशनांचा थरार राज्याने पाहिला आहे. त्यामुळे यंदाचे हे…

Read More

सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही:मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या महादेव बालगुडेंना जामीन; पिंपरी कोर्टाचा मोठा निर्णय

पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. कुलकर्णी यांनी महादेव विलास बालगुडे यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. बालगुडे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप होता. पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बालगुडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 152 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल त्यावेळी…

Read More

लाठीहल्ल्याचे अकोलेत तीव्र पडसाद:विद्यार्थ्यांचा केंद्र सरकारविरोधात आक्रोश

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या बंदला अकोले तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थ्यांसह वैचारिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शुक्रवारी अकोलेत मोर्चा काढला. अगस्ती महाविद्यालयाच्या शैक्षणिक बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील हजारो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले. एसएफआय, छात्रभारती आणि डीवायएफआय या युवक संघटनेने…

Read More

महिलेची पोर्तुगालमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक:वेश्याव्यवसायासाठी बिअर शॉप चालकाला विकल्याचा आरोप

चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेला पोर्तुगालमध्ये नेण्यात आले. तिथे तिची फसवणूक करून तिला वेश्याव्यवसायासाठी स्थानिक बिअर शॉप चालकाच्या ताब्यात दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमाननगर परिसरातील एका प्लेसमेंट कार्यालयाशी संबंधित व्यक्तींवर या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडित महिला नोकरीच्या शोधात असताना तिचा संपर्क संबंधित प्लेसमेंट कार्यालयातील व्यक्तींशी झाला. त्यांनी तिला…

Read More

बनावट सिमकार्ड, म्युल अकाउंट शोधण्याची मोहीम व्यापक:सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून मोहीम; उपायुक्त निलेश पालवे यांची माहिती

बनावट सिमकार्ड शोधणे आणि म्युल अकाउंट यांचा शोध घेऊन ती बंद करण्याची मोहीम महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून हाती घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त निलेश पालवे यांनी दिली. सायबर गुह्यांना आळा घालण्यासाठी ही मोहीम अधिक व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘शिखाज् कारीगरी’ आणि केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग…

Read More

राहुल गांधींच्या कार्यक्रमावर भाजपच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर:गोपाळ तिवारी म्हणाले, भाजप सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, विरोधकांना चिरडू नये

‘भाजप सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. सत्तेच्या माजातून विरोधकांना चिरडण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी करू नये. जनता सुज्ञ असून योग्य वेळी भाजपला धडा शिकवेल,’ असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना तिवारी बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष…

Read More

AI to Surpass Humans in All Digital Fields by 2028

सॅन फ्रान्सिस्को11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टेस्ला आणि X चे मालक एलन मस्क यांनी दावा केला आहे की, 2028 पर्यंत AI जगातील सर्व डिजिटल क्षेत्रांमध्ये प्रभुत्व मिळवेल आणि माणसांना मागे टाकेल. लोकप्रिय AI संशोधक फ्रांसुआ शोले यांच्या एका सिद्धांताला उत्तर देताना मस्क यांनी हे विधान केले आहे. शोले यांनी 2021 मध्ये भाकीत केले होते की, पुढील…

Read More