Headlines

कार्तिकस्वामी मंदिरात त्रिजटा उत्सवाचा जल्लोष: 25 कार्तिक मंडळांचा रथोत्सवात सहभाग, राम-सीता-लक्ष्मणाच्या वेशभूषेतील बालके



चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा कार्तिक त्रिजटा समाप्ती रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्तिकस्वामी मंदिर हे विदर्भातील एकमेव भुयारी कार्तिकस्वामींच मंदि

.

मेघा नदीच्या काठावर आणि सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या शिरजगाव कसबा येथील कार्तिकस्वामी मंदिराला पौराणिक महत्त्व आहे. मंदिराच्या वरच्या भागात साईबाबांचे मंदिर असून भुयारात पंचमुखी कार्तिकस्वामींची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या मागे त्यांचे वाहन असलेला मोर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना साईबाबा आणि गणेशाचे दर्शन घेता येते; मात्र मुख्य गाभाऱ्यातील कार्तिकस्वामींचे दर्शन केवळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घेता येते, अशी परंपरा आहे.

यंदाच्या उत्सवात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले. अशपाक काझी परिवारातर्फे भाविकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले, तर अर्जुन कार्तिक उत्सव मंडळाने पुरी आणि चना मसाल्याचा नाश्ता दिला. गावातील सासरी गेलेल्या लेकी दिवाळीऐवजी या उत्सवासाठी माहेरी येऊन नातेवाइकांच्या भेटीगाठी घेतात.

भाऊबीजही साजरी करतात. त्यामुळे या उत्सवाला गावाच्या सांस्कृतिक आणि कौटुंबिक परंपरेत विशेष स्थान आहे. उत्सवाला माजी खासदार नवनीत राणा आणि अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे उपस्थित होते. पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत आणि महावितरणचे सहकार्य लाभले. ठाणेदार अमन शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव आणि फुंसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

कार्तिक महिनाभर गावातील विविध भागांतून पहाटे काकड आरती आणि दिंडी काढली जाते; यामध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत ग्रामस्थ, महिला आणि चिमुकले मोठ्या संख्येने सहभागी होतात. मंदिरासमोरील आठवडी बाजार परिसरात मंदिर समितीतर्फे भागवत सप्ताह, कीर्तन-प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते, ज्याचा लाभ गावासह पंचक्रोशीतील भाविक घेतात. त्रिजटा उत्सवाच्या दिवशी सजविलेला रथ मंदिराला प्रदक्षिणा घालतो; यावेळी भाविकांची मोठी गर्दी जमते आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते. त्यानंतर पारंपरिक उत्साहात दहीहंडी फोडून या संपूर्ण उत्सवाची सांगता केली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *