Headlines

पुणे परिषदेत 20 लाख महिलांना सक्षम करण्याचा निर्धार:संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' घोषित केले

पुण्यात नुकत्याच झालेल्या एका गोलमेज परिषदेत कृषी मूल्यसाखळीत २० लाख महिलांना सक्षम करण्याचा निर्धार करण्यात आला. कोर्टेवा ॲग्रिसायन्सतर्फे आयोजित या परिषदेला संयुक्त राष्ट्रसंघाने २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग केवळ मजूर म्हणून न राहता त्यांना नेतृत्वाची संधी देण्याची गरज या परिषदेत…

Read More

नव्यानेच सुरू झालेल्या मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात:तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, जीवितहानी टळली; वाहतूक विस्कळीत

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्यानेच सुरू झालेल्या मिसिंग लिंकवर असलेल्या पुलावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील महामार्गावर काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून तिन्ही गाड्या पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. मिसिंग लिंकवरील केबल स्ट्रे पुलाजवळ तिसऱ्या मार्गिकेवर…

Read More

History Narrative on Maharana Pratap & Akbar; Battle of Haldihati

Marathi News National Mohan Bhagwat: History Narrative On Maharana Pratap & Akbar; Battle Of Haldihati उदयपूर1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक उदयपूरमध्ये राष्ट्र चेतना संकल्प सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, हल्दीघाटीच्या युद्धाबद्दल इतिहासकारांनी केवळ एक कथा (नरेटिव्ह) तयार केली. युद्धात केवळ महाराणा प्रताप यांचाच विजय झाला होता. मुघलांचेच इतिहासकार लिहितात की, मुघलांना…

Read More

'जेन झी' पिढीवर संघाचा पूर्ण विश्वास:सुनील आंबेकर यांचे पुणे श्रमिक पत्रकार संघात प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ‘जेन झी’ (Gen Z) पिढीबद्दल संघ आशावादी असल्याचे म्हटले आहे. आजचे तरुण भारतीय परंपरा आणि गौरवाशी जोडले गेले असून, समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे योगदान देत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. या वार्तालाप प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष…

Read More

शिवाजीनगरमधील हॉटेलमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश:परदेशी तरुणीसह तिघी ताब्यात, दोन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल

शिवाजीनगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिसांनी छापा टाकून परदेशी तरुणीसह एकूण तीन महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध विभागाला (एएचटीयू युनिट) शिवाजीनगरमधील एसटी स्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या…

Read More

लोकशाहीच्या पतनाला कोर्टच जबाबदार!:ठाकरे गटातील फुटीनंतर ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उल्हास बापट यांची थेट सर्वोच्च न्यायालयावर टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींवर आता ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य करत थेट सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षांतरबंदी कायद्याबाबत स्पष्ट आणि अंतिम भूमिका घेण्यात न्यायालयाने विलंब केल्यामुळेच देशातील राजकीय पक्षांमध्ये वारंवार फूट पडत असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सहा…

Read More

पोलिसांकडे तक्रार दिल्याने डोक्यात दगड मारला:पुण्यातील कर्वे रस्त्यावर तरुणाला गंभीर जखमी केले, आरोपी फरार

पुण्यात पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. कर्वे रस्त्यावर शुभम गोफणे नावाच्या आरोपीने कृष्णा रामचंद्र ढगे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहे. कृष्णा रामचंद्र ढगे (वय ३१, रा. रामनगर, वारजे माळवाडी) हे चालक असून, आरोपी शुभम गोफणे त्यांच्या…

Read More

नांदेडमध्ये 'मॅच फिक्स'चा आरोप:वडिलांच्या पक्षांतराच्या चर्चांदरम्यान कृष्णा पाटील म्हणाले – मी उद्धव ठाकरेंचाच सच्चा शिवसैनिक

ठाकरे गटातील राजकीय घडामोडींदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कृष्णा पाटील हे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव आहेत. आता स्वतः कृष्णा पाटील यांनी अधिकृत व्हिडिओ जारी करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी वडिलांच्या…

Read More

UPSC Recruitment 400 Posts | No PrelimsMains Exam

50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये 400 पदांसाठी थेट भरती काढली आहे. या भरतीमध्ये निवड होण्यासाठी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेप्रमाणे Prelims आणि Mains लेखी परीक्षा होणार नाही. म्हणजेच, या भरतीमुळे अनेक तरुणांना थेट अधिकारी होण्याची संधी मिळू शकते. शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय…

Read More

Sikar Student Suicide | Umesh Mali Ends Life Before NEET Exam Dream Shattered

35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 21 जून रोजी नीटची परीक्षा आहे. एकीकडे विद्यार्थी नीटच्या तयारीला लागले आहेत, तर दुसरीकडे नीट उमेदवारांच्या आत्महत्येच्या बातम्याही समोर येत आहेत. राजस्थानमधील सीकर येथे राहणाऱ्या 22 वर्षीय उमेश माळी या विद्यार्थ्याने सोमवारी दुपारी स्वतःच्याच फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. 21 जून रोजी उमेशचीही नीट परीक्षा होती आणि हा त्याचा तिसरा प्रयत्न…

Read More