नाथ महाराजांच्या पायी दिंडीत 6 हजार वारकऱ्यांवर उपचार:रेड स्वस्तिक सोसायटीची 17 वर्षांची अविरत आरोग्यसेवा
संत एकनाथ महाराजांची आषाढी पायी दिंडी पंढरीच्या वाटेवर भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. या पायी प्रवासात वारकऱ्यांच्या चरणांची आणि आरोग्याची काळजी घेण्याचे पवित्र काम रेड स्वस्तिक सोसायटी (छत्रपती संभाजीनगर शाखा) गेल्या १७ वर्षांपासून अविरत करत आहे. यंदाही या सेवेचे व्रत जोपासत, दिंडीच्या अवघ्या पहिल्या १२ दिवसांत तब्बल ६ हजार वारकऱ्यांवर वैद्यकीय उपचार करून मोफत औषधांचे वाटप…