उत्तराखंडच्या माजी मुख्य सचिवाच्या मुलाला अटक:IPS सांगून महिला शास्त्रज्ञाला घातला गंडा, MBBS विद्यार्थ्यांचे ₹15 लाख हडपले
उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव एस. रामास्वामी यांचा 35 वर्षीय मुलगा आर. यशोवर्धन याला देहरादून पोलिसांनी बनावट आयपीएस अधिकारी बनून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी स्वतःला कधी आयपीएस, कधी रॉ (RAW), सीबीआय (CBI), सीआरपीएफ (CRPF), एनआयए (NIA) आणि लष्कराचा वरिष्ठ अधिकारी सांगून लोकांना फसवित असे. पोलिसांनी त्याला गुरुवारी मसुरी रोडवरील सीएसआय (CSI) तिठ्यावरून अटक…