महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?:भाजपला सर्वाधिक 48%, शिंदे सेनेला 29%, राष्ट्रवादीला 22% वाटा; कार्यकर्त्यांची प्रतीक्षा संपणार
महायुती सरकारमधील रखडलेल्या महामंडळे आणि विविध शासकीय संस्थांवरील नियुक्त्यांबाबत अखेर मोठी हालचाल झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, लवकरच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटूनही विविध…