Headlines

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा अकोटमध्ये काँग्रेसकडून निषेध:राजीनाम्याची मागणी

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा अकोट शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर बलप्रयोग करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी…

Read More

दुर्मिळ अजगराला जीवनदान:अमानतपूर येथे सर्पमित्रांनी 25 फूट खोल विहिरीतून काढला नऊ फुटांचा अजगर

शहरापासून जवळच असलेल्या अमानतपूर येथील शेतकरी विनोद मुरूमकार यांच्या २५ फूट खोल विहिरीत पडलेल्या सुमारे ९ ते १० फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्रांनी धाडसी मोहीम राबवून सुखरूप बाहेर काढले. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दुर्मिळ अजगराला जीवनदान मिळाले आहे. अमानतपूर येथील विनोद मुरूमकार यांच्या शेतातील २५ फूट खोल विहिरीत मोठा अजगर पडल्याचे गावातील प्रज्ज्वल वाघ, सर्वेश वानखडे यांच्या निदर्शनास…

Read More

अवघा रंग एक झाला!:राज्यभरात आषाढी एकादशीचा भक्तीमय उत्साह, पंढरीत भाविकांचा महासागर

आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासूनच राज्यभरात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. आज पहाटे पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी त्यांनी ‘राज्यात चांगला पाऊस पडून पीक बहरू दे आणि महाराष्ट्र समृद्ध होऊ दे,’ अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी केली. राज्याच्या इतर भागांतही आषाढीचा मोठा उत्साह दिसून येत असून विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी…

Read More

‘कृषी वनीकरणा’तून शेतकऱ्यांचे उत्पन्न, अन्नसुरक्षेची निश्चिती:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 5 एकरात साकारतेय 5 कृषी वनीकरण मॉडेल्स‎

कृषी वनीकरणाचा दीर्घ २५ ते ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पणाला लावत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वनविज्ञान विभागातील प्रा. हर्षवर्धन देशमुख यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. एस. एस. हरणे, सहयोगी अधिष्ठाता डी. एम. पंचभाई, संशोधन संचालक एस. एस. माने यांच्या मार्गदर्शनात अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी प्रकल्प साकारला जात आहे. विद्यापीठाच्या परिसरात पाच एकरांवर…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:रूट निश्चितीमध्ये तांत्रिक अडचण; बेलोऱ्याहून ‘नाइट लॅंडिंग’ रखडले

बेलोरा विमानतळावरून रात्रीचे लॅंडिंग व टेकऑफ ‘रूट’ निश्चिती करण्यात तांत्रिक अडचण असल्याने रखडले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी बेलोरा विमानतळासाठी नेमकी कोणत्या मार्गाने विमानसेवा द्यावी, यासाठी आपल्याकडे कोणते विमान उपलब्ध आहे. याबाबत एअर इंडियाने डीजीसीएला कळवले आहे. तसेच रात्री थेट मुंबई ते बेलोरा व बेलोरा ते मुंबई विमानसेवा देण्यात ज्या तांत्रिक अडचणी आहेत, त्याबाबतही माहिती दिली आहे….

Read More

कौंडण्यपुरात आज भाविकांची गर्दी:पहाटे 6 वाजता महापूजा : गर्दी लक्षात घेता बंदोबस्तात केली वाढ

माता रुक्मिणीचे माहेर असलेले कौंडण्यपूर हे विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (दि. २५) पहाटे ६ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होणार असून, दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी कौंडण्यपुरात दाखल होणार आहे. दरम्यान या सोहळ्यामुळे अवघ्या कौंडण्यपूरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. बसची तत्काळ व्यवस्था कौंडण्यपुरसाठी…

Read More

Amruta Fadnavis Statement On Devendra Fadnavis & NEET Exam Controversy

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठी दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी देणार असल्याच्या चर्चांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. पंढरपूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “मला महाराष्ट्रातच राहायचं आहे आणि दे . यावेळी अमृता फडणवीस यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेले आंदोलन योग्य असल्याचे सांगत त्यांनी, सरकारने या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट,…

Read More

विठुरायाच्या दर्शनाची ओढ:विशेष ट्रेनने अमरावतीचे वारकरी निघाले पंढरपूरसाठी दर्शनाला

विठ्ठलाच्या दर्शनाची मनात ओढ घेतलेले वारकरी शुक्रवारी २४ रोजी विशेष ट्रेनने नवी अमरावती अकोली रेल्वे स्टेशनवरून वारीला निघाले. त्यावेळी त्यांनी जय हरी विठ्ठल असा एकच गजर केला. २५ रोजी आषाढी एकादशीला ही विशेष ट्रेन स. ९ वाजताच्या सुमारास पंढरपूर स्टेशनवर पोहोचणार आहे. त्यानंतर सर्व वारकरी थेट इंद्रायणी नदीवर जाऊन स्नान करतील. स्नान आटोपल्यानंतर कळसाचे दर्शन…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना:हिंगोलीतील 673 गावातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ६७३ गावातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी शुक्रवारी ता २४ जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती…

Read More

एमपी- यूपीसह 5 राज्यांना पावसाचा अलर्ट:गुजरातमध्ये नद्यांना पूर, आसाममध्ये 61 मृत्यू; अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू

उत्तर भारतात पावसाचा जोर कायम आहे. 5 राज्यांमध्ये सामान्य ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशात मान्सूनची मजबूत प्रणाली सक्रिय आहे. त्यामुळे आज राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर प्रदेशात गेल्या 15 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे शनिवारी राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे….

Read More