Headlines

काँग्रेसचा खरा चेहरा उघड, ट्रम्प यांनी भारताकडून शिकावे:मंत्री आकाश फुंडकरांची बुलढाण्यात चौफेर फटकेबाजी

राज्याचे कामगार मंत्री आकाश पांडुरंग फुंडकर यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले असून, स्वस्त प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्ये करणाऱ्या विरोधकांना थेट ‘डोके तपासून घेण्याचा सल्लाही दिला आहे. “काँग्रेसने ‘वंदे मातरम’चा राजकीय वापर केला” काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर सडकून टीका करताना…

Read More

जरा बारामतीकडेही लक्ष द्या!:अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचे खुले पत्र, गुन्हेगारीपासून नगरपरिषदेच्या कारभारापर्यंत मांडल्या समस्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर बारामतीतील राजकीय आणि सामाजिक वातावरणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीतील नागरिकांच्या नावाने समाजमाध्यमांवर एक पत्र मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या पत्रातून “जरा बारामतीकडेही लक्ष द्या”, अशी थेट विनंती पवार कुटुंबीयांना करण्यात आली आहे. या पत्रात बारामतीतील…

Read More

Gold Silver Price Drop | India IBJA Rate Update 2026

11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोने-चांदीच्या दरात 19 ऑगस्ट रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदीचा दर 5,772 रुपयांनी घसरून 2.27 लाख रुपयांवर आला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,196 रुपयांनी कमी होऊन 1.53 लाख रुपयांवर आहे. या वर्षी सोने-चांदीमध्ये आतापर्यंत तेजी राहिली या वर्षी सोने-चांदीच्या दरात…

Read More

Ashwini Bhide Accuses SRA Mumbai Of Violating Rules

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या कारभारावर आता थेट मुंबई महापालिकेकडूनच आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला थेट पत्र पाठवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कारभार . नगरविकास खात्यांतर्गत येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून आपल्या अधिकारांचा मोठा गैरवापर केला जात असल्याचा आरोप अश्विनी भिडे यांनी पत्रात केला आहे. झोपडपट्टी नसलेल्या मोकळ्या…

Read More

US Ambassador Sergio Gor Praises CM Devendra Fadnavis in Mumbai

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी जाहीरपणे कौतुक केले आहे. “आजघडीला महाराष्ट्र 2 कारणांमुळे जगाच्या नकाशावर आहे. एक म्हणजे मुंबई आणि दुसरे म्हणजे तुमचे विलक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,” अशा . ही प्रशंसा केवळ राजकीय नेत्याकडून किंवा उद्योगविश्वातील व्यक्तीकडून झालेली नसून, भारतातील अमेरिकेचे अधिकृत प्रतिनिधी असलेल्या राजदूतांकडून झाल्याने तिची राजकीय आणि…

Read More

ईशा कोप्पिकर म्हणाली- मी अंधभक्त:खासदार कंगना रनोट समर्थनासाठी पुढे आल्या, म्हणाल्या- माझ्यासाठी चांगले समजावले

ईशा कोप्पिकरने नुकताच एक व्हिडिओ जारी करून स्वतःला अंधभक्त म्हटले आहे. ईशाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोटने तिच्या विधानावर सहमती दर्शवत पाठिंबा दिला आहे. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या ईशा कोप्पिकरने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ जारी करून म्हटले आहे की, ‘नमस्ते, मी ईशा कोप्पिकर, अंधभक्त. जर आपल्या देशावर…

Read More

Shinde Faction Demands Ministerial Berth

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. ऑगस्टमध्येच केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता असल्याचे संकेत गेल्या काही आठवड्यांपासून मिळत आहेत. मात्र, फेरबदलाची अधिकृत . या संभाव्य फेरबदलात महाराष्ट्राच्या राजकारणालाही विशेष महत्त्व मिळू शकते. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लोकसभेतील 13 खासदारांची ताकद दाखवल्यानंतर केंद्रातील मंत्रिपदांसाठी आपला…

Read More

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच:पेठ तालुक्यात पुन्हा सौम्य हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजता पेठ तालुक्यातील काही भागात जमीन हादरल्याचे जाणवले. अचानक धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. गोंदे ते एकदरेपर्यंत परिसराला हादरे मिळालेल्या माहितीनुसार, गोंदे, करंजाळी, भायगाव,…

Read More

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- पालक मुलांना मालमत्तेतून बाहेर काढू शकतात:निर्वाह आणि सुरक्षेसाठी बेदखल करण्याचा अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, उदरनिर्वाहासाठी आणि सन्मानासाठी त्यांच्या मुलांना मालमत्तेतून बाहेर काढले जाऊ शकते. न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, पालक आणि ज्येष्ठ नागरिक (देखभाल व कल्याण) अधिनियम, 2007 अंतर्गत स्थापन केलेल्या न्यायाधिकरणाला (ट्रिब्यूनल) गरज पडल्यास बेदखलीचा आदेश देण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने म्हटले,…

Read More

अवैध जुगार अड्ड्याची माहिती दडवणे पडले महाग:बळसोंडच्या पोलिस पाटील शिखरे 1 महिन्यासाठी निलंबित, उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय

बळसोंड परिसरात सुरु असलेल्या अवैध जुगाराची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना न दिल्याच्या आरोपावरून बळसोंडच्या पोलिस पाटील यांना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी नुकतेच काढले आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगत बळसोंड गावालगत अकोला बायपास ते गारमाळ जाणाऱ्या मार्गावर मोकळ्या जागेत टाईम बाजार नावाचा जुगार खेळला जात होता….

Read More