नेतृत्व म्हणजे पद नव्हे, तर जबाबदारी स्वीकारण्याची संधी- भोजराज चौधरी:एडिफाय शाळेत पदग्रहण समारंभ सोहळा, उत्तरदायित्वाची दिली जाणीव
नेतृत्व हे केवळ सन्मानाचे प्रतीक नसून जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपण्याची संधी आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नेतृत्व करणारे नागरिक आहेत, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. भोजराज चौधरी यांनी केले. एडिफाय शाळेत चालू शैक्षणिक सत्रासाठी आयोजित पदग्रहण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यात नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना बॅच प्रदान करून नेतृत्व,…