Headlines

बिहारमध्ये पुराचा 34 लाख लोकांना फटका:यूपीत पावसाचा कोटा पूर्ण, राजस्थानात या हंगामात 24 टक्के कमी पाऊस

बिहारमध्ये पुरामुळे 9 हून अधिक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे 13 जिल्ह्यांतील सुमारे 34 लाख लोकसंख्या प्रभावित झाली आहे. हवामान विभागाने बिहारमध्ये 8 ते 10 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. यूपीमध्ये मान्सून हंगामातील पावसाचा कोटा पूर्ण झाला आहे. गेल्या 24 तासांत 55 जिल्ह्यांमध्ये सरासरी 4.4 मिमी…

Read Full News

‘नजराणा चोरी’चा शोध; जिल्हाभर जुन्या अभिलेखांची झडती‎:जिल्ह्यातील 10 तहसील कार्यालयांत 490 तलाठ्यांचे सुट्टीच्या दिवशीही रेकॉर्ड रूममध्ये ठाण‎

एका क्लिकवर सातबारा अन् कागदमुक्त कारभाराचा गवगवा केला जात असला, तरी त्याच संगणकीकृत सातबाऱ्यामागे दडलेला जमिनींचा जुना हिशेब शोधण्यासाठी तलाठ्यांना आता धुळीने माखलेल्या लाल गाठोड्यात शोधाशोध करावी लागत आहे. भोगवटादार वर्ग-२ जमिनींच्या खरेदी-विक्रीत शासनाचा कोट्यवधींचा नजराणा बुडाला का, परवानगीशिवाय व्यवहार झाले का आणि जुन्या सातबाऱ्यावरील अटी-शर्ती संगणकीकरणात कुठे गायब झाल्या, याचा छडा लावण्यासाठी जिल्ह्यातील ४९०…

Read Full News

कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज:सोयगावमध्ये कापसावर लाल्या, माव्याचे थैमान, पावसाच्या ओढीनंतर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला‎

तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसावर यंदा संकटांची मालिका सुरूच आहे. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कापसावर मावा, तुडतुडे आणि ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नवे संकट उभे ठाकले आहे. घोसला परिसरासह तालुक्यातील अनेक भागांत कापसाची पाने पिवळी व लालसर पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चालू खरीप हंगामात सोयगाव तालुक्यात २९ हजार…

Read Full News

सर्वोच्च न्यायालयात धनगर आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडा; फुलंब्रीत मोर्चा:सकल धनगर समाज, नायब तहसीलदार संजीव राऊत यांना निवेदन‎

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने धनगर समाजाच्या बाजूने ठाम व भक्कम भूमिका मांडावी, या मुख्य मागणीसाठी फुलंब्री येथे सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार . सर्वोच्च न्यायालयात कोणतीही संदिग्ध भूमिका न घेता, राज्य सरकारने आपल्या पूर्ण कायदेशीर ताकदीने धनगर समाजाच्या हक्काची बाजू मांडावी, जेणेकरून आरक्षणाचा हा वर्षानुवर्षांचा…

Read Full News

Russia’s Arctic oil project begins; 30 million tons of annual supply could be an alternative to the Gulf

Marathi News National Russia’s Arctic Oil Project Begins; 30 Million Tons Of Annual Supply Could Be An Alternative To The Gulf मॉस्को/नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिका आणि युरोपीय देशांच्या निर्बंधांनंतरही रशियाने आर्क्टिक क्षेत्रात आपला महाकाय ‘व्होस्तोक ऑइल’ प्रकल्प सुरू केला आहे. २०२७ च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत वर्षाला ३ कोटी टन कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट…

Read Full News

सलग तिसऱ्या वर्षी संभाजीनगरातील मंत्रिमंडळाची बैठक रद्द:कामे अपूर्णच, 8 दिवस शिल्लक असूनही सूचना नाही

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त तीन वर्षांपूर्वी (१६ सप्टेंबर २०२३) शहरात झालेल्या राज्य मंत्रिमंडळात ५९ हजार कोटी रुपयांच्या कामाची घोषणा केली. यामध्ये नवीन योजना, जुन्या योजनांच्या सुप्रमा, चालू योजनांचा निधी आदी विविध तरतुदी कर . मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी मराठवाड्यात दरवर्षी मुक्तिसंग्रामदिनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घोषणा केली होती. मात्र, त्याची…

Read Full News

फुलोऱ्यात आलेल्या पिकांना मिळेना पाणी:ऐन पावसाळ्यात धरणांत पाणी नाही; मराठवाड्यात 6 लाख हेक्टरला फटका

मराठवाड्यात या वर्षी धरणसाठ्यांतील परिस्थिती गंभीर झाली आहे. एकीकडे कोरडवाहू क्षेत्राला फटका बसत असताना मराठवाड्याच्या सिंचन क्षेत्राला जवळपास ६ लाख हेक्टर क्षेत्राला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास त्याचा मोठा फटका मराठवाड्याला बसणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्याचे निम्म्यापेक्षा अधिक सिंचन क्षेत्र घटणार असल्यामुळे किमान ८ लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे….

Read Full News

गोंदियात भरधाव ट्रकची पिकअपला धडक:मध्य प्रदेशातील 6 मजूर ठार, 7 गंभीर जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव ट्रकने (एमएच ३५ एजे २५४७) समोरून येणाऱ्या मजुरांच्या पिकअपला ( एमपी १५ टी ३४९५) धडक दिली. यात ३ वर्षांच्या बालकासह ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ गंभीर जखमी झाले. गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा-मोहरानटोली येथे सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व मजूर मध्य प्रदेशातील बालाघाटचे रहिवासी असून, तेलंगणातील हैदराबाद…

Read Full News

BRICS परिषदेची वेगवान तयारी, ठिकठिकाणी सजावट:न्यायालय, सरकारी कार्यालये 3 दिवस बंद; वाहतुकीसाठी 22 वळण बिंदू

नवी दिल्लीत होणाऱ्या BRICS परिषदेपूर्वी राजधानीला पोस्टर आणि रोषणाईने सजवण्यात आले आहे. राजधानीचे अनेक भाग सणासारखे दिसत आहेत. BRICS परिषद 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये होणार आहे. या वर्षाची अधिकृत थीम “बिल्डिंग फॉर रेजिलिएंस, इनोवेशन, कोऑपरेशन एंड सस्टेनेबिलिटी” अशी आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी परिषदेसाठी वाहतूक योजना तयार केली आहे. VIP ताफ्यांच्या…

Read Full News

2023 मध्ये संभाजीनगरचे नामकरण, तरी 2018 च्या क्रीडा प्रमाणपत्रावर नाव:पुण्यात 75 काेटींचा घाेटाळा; दोघांना कोठडी, 19 पोलिस नियुक्त्या धोक्यात

कुराश या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा न घेताच बोगस क्रीडा प्रमाणपत्रे वाटून शासकीय नोकरीत 5 टक्के क्रीडा आरक्षण मिळवणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, 2018-19 मध्ये वाटलेल्या या प्रमाणपत्रांवर औरंगाबाद आणि उस्मानाबादऐवजी त्यानंतरच्या काळात बदलण्यात आलेली ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ ही नावे वापरल्याने रॅकेटचे बिंग फुटले. याप्रकरणी अटक केलेला राज्य कुराश संघटनेचा अध्यक्ष…

Read Full News