Headlines

जपानने मंगळाचा चंद्र फोबोससाठी अंतराळयान पाठवले:2031 पर्यंत तिथून माती आणणार; मिशन यशस्वी झाले तर इतिहासात प्रथमच घडेल

जपानने आज 20 ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ‘फोबोस’साठी मोहीम प्रक्षेपित केली आहे. मार्शियन मून्स एक्सप्लोरेशन मिशनअंतर्गत तानेगाशिमा स्पेस सेंटरमधून H3 रॉकेटद्वारे सुमारे 5 टन वजनाचे अंतराळयान अवकाशात पाठवण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश फोबोसवर उतरणे, तेथील माती-धुळीचे नमुने गोळा करणे आणि ते वर्ष 2031 पर्यंत पृथ्वीवर परत आणणे हा आहे. मंगळाचे दोन्ही…

Read Full News

शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार:दसरा मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष; व्होट चोरी ते दुष्काळ… ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पारंपरिक दसरा मेळावा आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत 2022 मध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र दसरा मेळावे होत आहेत. त्यामुळे शिवतीर्थावरील मेळावा हा…

Read Full News

गुजरातच्या तरुणाने महाराष्ट्रातील 1700 फूट खोल दरीत उडी मारली:13 मिनिटांच्या अंतिम व्हिडिओत म्हटले- 498 ची प्रकरणे जीव घेतात

गुजरातमधील भावनगरच्या चित्रा येथे राहणाऱ्या विश्वराजसिंह मयुरसिंह गोहिल यांनी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडच्या कोकणकडा पर्वतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मूळचे राजपरा (ठाडच) येथील रहिवासी असलेल्या विश्वराज यांनी 13 मिनिटांचा व्हिडिओ बनवल्यानंतर 1700 फूट खोल दरीत उडी घेतली. व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले की, जर तुम्हाला मुलगा असेल आणि त्याचे भविष्य बिघडवायचे नसेल, तर हा व्हिडिओ शेअर…

Read Full News

लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येच्या आरोपीला नागपूरमधून अटक:मॉडेल श्रद्धा 11 दिवसांपासून फरार होती; यूपी एसटीएफने बहिणीला आणि चालकाला देखील पकडले

लखनौमधील शिवा शर्मा हत्याकांडात फरार असलेली मॉडेल श्रद्धा दुबे हिला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. यूपी एसटीएफने मंगळवारी तिची बहीण आणि चालक दानिश यालाही ताब्यात घेतले आहे. तिघांनाही आजच लखनौला आणले जाऊ शकते. श्रद्धा दुबे ११ दिवसांपासून फरार होती. ९ ऑक्टोबर रोजी कोट्यधीश व्यावसायिक शिवा शर्मा यांचा अवध ग्रीन अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून संशयास्पद परिस्थितीत पडून…

Read Full News

निवृत्ती वेतन योजनेचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची 7.49 लाखांची फसवणूक:बाणेर पोलिसांत सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यात सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ७ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. खासगी बँकेकडून निवृत्ती वेतन योजना सुरू होणार असल्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाणेरमधील पॅनकार्ड रस्त्यावर राहणाऱ्या ७६ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला खासगी…

Read Full News

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय मंथन:उद्या अर्ज माघारीची अंतिम मुदत

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज सर्किट हाऊसवर सर्वपक्षीय बैठक सुरू झाली. दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध करण्यावर या बैठकीत चर्चा होत आहे. उद्या, २१ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. बँकेच्या २१ जागांसाठी २ नोव्हेंबरला मतदान होईल. मागील निवडणुकीत १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. यंदा दुष्काळ असल्याने ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी…

Read Full News

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाला मारहाण करून लुटले:बिबवेवाडीत चौघांचा धुडगूस, सोनसाखळी, रोकड आणि मोबाइल हिसकावला

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण करुन त्याला लुटण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली. या प्रकरणी संदीप उर्फ सँडी चव्हाण, सनी भरगुडे, सनी साळवी, मयूर भोसले (सर्व रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read Full News

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा साधेपणाने:शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेकडो ट्रक रवाना, मुलींच्या लग्नाची चिंता करू नका, शिवसैनिक जबाबदारी घेतील- शिंदे

यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” असा शब्द देत शिवसेनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागासाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे शेकडो ट्रक आज रवाना करण्यात आले. तसेच, शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेना घेणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ‘दुष्काळात…

Read Full News

Dhananjay Munde Assures Support To Farmers In Beed

“संतश्रेष्ठ भगवान बाबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची पावन परंपरा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यभर जपली आणि मुंडे साहेबांनंतर हीच परंपरा आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे अत्यंत समर्थपणे पुढे चालवत आहेत. आज ऑक्टोबरच्या या तळपत्या उन्हात . पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर आयोजित 12व्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर पर्यावरण व पशुसंवर्धन…

Read Full News

CJP कार्यकर्त्यांचे तुरुंगात जाणे हा गांधीवादी सत्याग्रह:अभिजीत दिपके म्हणाले- आमच्या आंदोलनाची तुलना नेपाळ-बांगलादेशच्या निदर्शनांशी करणे योग्य नाही

नवी दिल्लीमध्ये CJP कार्यकर्ते अभिजीत दिपके यांनी मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी व्हिडिओ निवेदन जारी केले. त्यांनी भारतातील निदर्शनांची तुलना नेपाळ आणि बांगलादेशातील सत्ताबदलाशी करण्यास नकार दिला. दिपके यांनी तुरुंगात असलेल्या कार्यकर्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांचा बचाव केला. दोघांनी शांततेने तुरुंगात जाणे हे गांधीवादी सत्याग्रहाचा पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या असंतुष्टांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला…

Read Full News