पुण्यात वेगवेगळ्या अपघातात अल्पवयीनासह दोघांचा मृत्यू:सिंहगड रस्ता आणि येरवडा परिसरात घडल्या घटना, दोघांवर गुन्हा दाखल
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातांत अल्पवयीनासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा, तसेच येरवडा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार अल्पवयीनाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. प्रथमेश राजू लोखंडे (वय १७, रा. कृष्णकुंज सोसायटी, गोकुळनगर, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या अल्पवयीनाचे नाव आहे. याबाबत बेबी राजू लोखंडे…