Headlines

हरणबारीची सुरक्षा वाऱ्यावर:शेतकरी 30 वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत; मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन, प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा

हरणबारी धरणाच्या सुरक्षेसह शेतकऱ्यांच्या प्रलंबित मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणाच्या मुख्य प्रवेशद्वाराला गेट नसणे, सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षकांचा अभाव, तसेच धरणाच्या भिंतीवर आणि सांडव्यावर दुचाकीवरून स्टंटबाजी होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. उजव्या कालव्यासाठी जमीन देऊन ३० वर्षे उलटूनही बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याचा मुद्दाही पक्षाने उपस्थित केला आहे. या मागण्यांसाठी…

Read Full News

दोडी बुद्रुकमध्ये आजपासून ‘सत्याग्रह’:विश्वस्त मंडळाच्या वैधतेवर‎ग्रामस्थांचे प्रश्नचिन्ह‎

दोडी बुद्रुक येथील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाची वैधता तपासून संस्थेच्या शाळा व महाविद्यालयावर तातडीने प्रशासक नियुक्त करावा, या मागणीसाठी ग्रामस्थ व सभासद सोमवार (दि. १९) पासून बेमुदत सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. येथील श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज समाधीस्थळावर सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात…

Read Full News

हरसूल-ठाणापाडा विभागातील 18 गावांत पिके करपली:शेतकऱ्यांच्या हाती यंदा शून्य, आमदार हिरामण खोसकरांकडून पाहणी

हरसूल-ठाणापाडा परिसरातील १८ गावांमध्ये पावसाअभावी भात, नागली, उडीद व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पिकांची अवस्था बिकट झाली असून, उत्पादनाची आशा संपली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त शेतीची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना…

Read Full News

हार्वेस्टरमध्ये अडकून १५ वर्षीय ओम मोरेचा मृत्यू:हुंड्यामोख शिवारातील दुर्दैवी घटना‎

तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे) शिवारात शनिवारी (दि. १७) सोयाबीन काढणीचे काम सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून १५ वर्षीय ओम संतोष मोरे याचा मृत्यू झाला. ओम हा कुत्तरबारी येथील रहिवासी होता. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुत्तरबारी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कळवण तालुक्यातील पुनंद खोऱ्यातील हुंड्यामोख शिवारात सोयाबीन काढणीचे…

Read Full News

तरुणावर गोळीबार, 2 राउंड हवेत फायर:नाशिकमधील आडगावात शेताकडून घरी जाणाऱ्या तरुणाला अडवून दहशत

आडगाव न्यू इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरुणाला अडवत दोघांनी वाद घालून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १८) दुपारी २ वाजता घडला. हल्लेखोर जेलरोड येथील असल्याची माहिती पुढे अाली. पथक संशयित राहुल अांबेकरच्या मागावर अाहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश माळोदे हा शेतातील कामे संपवून न्यू इंग्लिश स्कूल रस्त्यावरील पुलाखालून घराकडे जात असताना महामार्गावरून अालेल्या दुचाकीवरील…

Read Full News

खासदार सुप्रिया सुळे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर:बैठकीचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वाजता शहरात आगमन झाल्यानंतर त्या पद्माकर मुळे यांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सूर्यकांता गाडे यांच्या संस्थेला भेट देतील. दुपारी मौलाना आझाद संस्थेच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर…

Read Full News

जायकवाडीसह आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यातील पंपांचा पाणी उपसा बंद:15 अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम, नियमबाह्य पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई‎

पावसाने ओढ दिली, खरीप पिकांचे नुकसान झाले आणि आता उपलब्ध पाणी किती दिवस पुरणार, याची चिंता शेतकरी व ग्रामस्थांना सतावत आहे. अशा परिस्थितीत जलसाठ्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासन १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच ी टीम तयार करुन अनधिकृत मोटारीचा पाणी पुरवठा खंडित करणे सुरू केले आहे. सध्या आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यातील कृषी मोटारी काढायला सुरू करण्यात…

Read Full News

मध्य प्रदेशाच्या 11 जिल्ह्यांत पाऊस, जयपूरमध्ये गारपीट:तामिळनाडूत मुसळधार पाऊस, नैनीतालमध्ये तापमान 12°C च्या खाली

मध्य प्रदेशात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नवरात्री आणि दसऱ्याच्या तयारीवर परिणाम झाला आहे. सीहोरमध्ये मंडपांचे तंबू उडून गेले, तर महूमध्ये रावणाचे पुतळेही भिजले. गेल्या 24 तासांत इंदूर-उज्जैनसह 11 जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली. राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा सौम्य परिणाम कायम आहे. जयपूर आणि अजमेरमध्ये रविवारी अनेक भागांत पाऊस झाला. गारपीटही झाली. टोंक आणि बारां जिल्ह्यांतही पाऊस पडला….

Read Full News

संतप्त तरुणाने विचारला आमदार चव्हाणांना जाब:पदवीधर निवडणूक प्रचारात वैजापुरात खळबळ‎

पदवीधरांचे प्रश्न ऐकण्यासाठी संवादाचा मंच सजला खरा; मात्र त्याच मंचावर आमदार सतीश चव्हाण यांना थेट जाब विचारण्यात आल्याने रविवारी (१८ ऑक्टोबर) वैजापुरातील राजकीय वातावरण तापले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी कुठे होता? विद्यार्थ्यांसाठी जंतरमंतरवर का गेला नाहीत? भरती प्रक्रियेतील कथित आर्थिक देवाणघेवाणीबाबत तुमची भूमिका काय? अशा प्रश्नांची सरबत्ती अजय पाटील साळुंके यांनी भरसभेत केली. प्रश्नांचा भडिमार सुरू…

Read Full News

लासूर स्टेशन:सनव खून प्रकरणातील सात जणांना अटक

सनव (ता. गंगापूर) येथील शिवना नदीपात्रात वाळू उपशाच्या वादातून दहा दिवसांपूर्वी मध्यरात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीत लोखंडी रॉडने डोक्यात वार करून रियाज साहेबखा पठाण यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील सात जणांना पोलिसांनी विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले असून,त्यापैकी सहा जणांना अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे….

Read Full News