कर्नाटक सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतेय…:केंद्राच्या मदतीची वाट न पाहता सरकारने तातडीने दिलासा दिला, विरोधकांनी कर्नाटकचे वास्तव पाहावे- नवनाथ बन
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींसमोर काय पत आणि इज्जत आहे, हे आपण सर्वांनीच पाहिले आहे. राहुल गांधींनी कॉलर धरून त्यांना मागे खेचले होते आणि आता तेथील सरकार शेतकऱ्यांना कॉलर धरून मागे खेचण्याचे काम करत आहे. ज्या राज्यात सत्ता आहे, तिथे काँग्रेस शेतकऱ्यांना भरीव मदत का करत नाही? असा थेट सवाल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला…