Headlines

नामांकित उद्योग समूहाच्या 3 हॉटेल्स, अन् घरावर आयकर विभागाचे छापे:पुणे विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक सकाळीच धडकले; छाप्यामागील मुख्य कारण अद्याप गुलदस्त्यात‎

शहरातील एका नामांकित हॉटेल उद्योग समूहाच्या तीन हॉटेल्ससह संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या पुणे येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकले. यामुळे राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली. . आयकर विभागाच्या या पथकाकडून पुणे महामार्गावरील प्रसिद्ध दोन हॉटेल्ससह शहरातील एका हॉटेलवर बुधवारी सकाळी छापे टाकले. शहरातील या उद्योग समूहाच्या संचालकांच्या घरीही छापा टाकण्यात आला. सकाळी सात वाजता एकाच…

Read Full News

सुरक्षेशी तडजोड नाही; कठोर कारवाई!‎:मनपा आयुक्तांचे संबंधित विभागप्रमुखांना निर्देश, नवरात्र उत्सवासाठी अमरावती मनपा प्रशासन सज्ज‎

शहरातील प्रसिद्ध अंबादेवी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. नवरात्र उत्सवादरम्यान शहरातील विविध देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे . विसर्जनाच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता विसर्जन मार्गाची आधीच तपासणी करावी. मार्गावर असलेले अडथळे, अनधिकृत अतिक्रमणे आणि नागरिकांच्या हालचालींमध्ये अडचण निर्माण करणाऱ्या…

Read Full News

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात 16 ला आंदोलन:विविध संघटनांचा सहभाग, इर्विन चौकात देणार दिवसभर धरणे‎

येथील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने आगामी शुक्रवार, १६ ऑक्टोबरला इर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ धरणे आंदोलन केले जाणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटविण्यासाठी दिल्लीत विद्यार्थी-युवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याचा निषेध या धरणे आंदोलनाद्वारे केला जाणार असून दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला जाणार आहे. तशी आखणी शहरात…

Read Full News

तुकाराम मुंढेंच्या धाकाचा परिणाम आहे का?:MPSC आयोगाला रोहित पवारांचा इशारा, जुनी कागदपत्रे नष्ट करण्यास विरोध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या विरोधात विद्यार्थ्यांसोबत सलग अकरा दिवस रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आयोगाला पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘आंदोलन स्थगित केले म्हणजे प्रकरण संपले, अशा भ्रमात कुणीही राहू नये,’ असे सुनावत त्यांनी आयोगाच्या जुनी कागदपत्रे नष्ट करण्याच्या निर्णयावर तीव्र…

Read Full News

गुजरात-वडिलांनी 2 वर्षांच्या मुलावर पेट्रोल ओतून जाळले:हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरला; एकट्याने संगोपन करू इच्छित नव्हता, अटक

गुजरातमधील वाव-थराड जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या 2 वर्षांच्या मुलावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी मुलाला ओझे मानत होता. ही घटना मंगळवारी जिल्ह्यातील सुईगाम तालुक्यात घडली. आरोपी अशोक रावलला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, रावलने मुलाला आग लावल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी FIR दाखल…

Read Full News

माहिती अधिका­ऱ्यांनी जनतेला तत्काळ माहिती द्यावी- आयुक्त:विद्यापीठात माहिती अधिकार सप्ताहानिमित्त व्याख्यान‎

शासकीय कामकाजात पारदर्शकता आणून नागरिकांप्रती उत्तरदायित्व निर्माण करणे. भ्रष्टाचाराला आळा घालणे. या उद्देशाने माहिती अधिकार कायदा तयार झाला. त्यामुळे जनतेने मागितलेली माहिती उपलब्ध असेल, तर ती तातडीने द्यावी, असे मत अमरावती खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाच्यावतीने माहिती अधिकार सप्ताहनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख अतिथी…

Read Full News

ना नेटवर्क, ना रस्त्यांच्या पुरेशा सुविधा; तरी एकजुटीचा उत्सव:मेळघाटातील सीमेवर कोकमार गावात ‘एक गाव, एक नवदुर्गा’‎

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्राच्या कुशीत, मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेले कोकमार हे गाव भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असले, तरी येथील माणसांच्या मनातील एकोपा आणि संस्कृतीवरील प्रेम आजही टिकून आहे. महाराष्ट्राच्या सीमाभागातील या गावात आधुनिक सुविधांचा अभाव जाणवत असला, तरी सण-उत्सवांच्या माध्यमातून गावकरी एकत्र येऊन आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करतात. ‘एक गाव, एक गणपती आणि एक गाव, एक…

Read Full News

हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी:बाळापूर तहसील कार्यालयावर काँग्रेसच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांचा मोर्चा‎

शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजारांची मदत मदत द्या, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेस नेत्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत बाळापूर येथे मोर्चा काढला. तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला. बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी , २०२५-२६ मधील चालू कर्जासह संपूर्ण कर्ज माफ करावे, गतवर्षी व यावर्षीचे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या…

Read Full News

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ₹13 हजार कोटी मिळाले:68% खर्च रस्त्यांवरील धूळ हटवण्यावर; 2023 मध्ये प्रदूषणामुळे 20 लाख मृत्यू झाले

देशातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी 2019 पासून आतापर्यंत 13 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी जारी करण्यात आला, मात्र खर्च झालेल्या रकमेपैकी 68% हिस्सा केवळ रस्त्यांवरील धूळ हटवण्यावर खर्च झाला. अर्थ5आरच्या इंडिया एअर पॉल्युशन 2026 अहवालानुसार, 2023 मध्ये प्रदूषित हवेमुळे 20 लाख लोकांचा मृत्यू प्रदूषणाशी संबंधित असल्याचे आढळले. ही संख्या 2000 च्या तुलनेत 43% अधिक आहे….

Read Full News

सरकारचा कुटील डाव, साखर रोखणार; राजू शेट्टींचा इशारा:मुख्यमंत्र्यांकडून सामंजस्याचे आवाहन, म्हणाले- आपले कारखाने बंद राहिल्यास कर्नाटकचा फायदा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन दुसऱ्या दिवशी अधिकच तीव्र झाले आहे. एकीकडे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर ‘कुटील डाव’ खेळत असल्याचा गंभीर आरोप करत कारखान्यातून साखर बाहेर पडू न देण्याचा इशारा दिला आहे; तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. कारखाने बंद…

Read Full News