Headlines

तुळजापूरहून देवीची ज्योत नेणाऱ्या चाैघांना कंटेनरने चिरडले; तीन ठार:मृत संभाजीनगर जिल्ह्याचे रहिवासी; पिंपळगाव पांढरीतील घटना

बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात तुळजापूरहून देवीची ज्योत पायी घेऊन गोळेगाव व जाफ्राबादवाडी (ता. खुलताबाद) येथे जाणाऱ्या चार तरुणांना भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमार . मिळालेल्या माहितीनुसार, गोळेगाव व जाफ्राबादवाडी (ता. खुलताबाद) येथील भाविक श्रीक्षेत्र तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन पायी येत होते. तेलपुरवठा करणारे दोघे दुचाकी…

Read Full News

यवतमाळनंतर अकोल्यातही 1,101 बनावट जन्म दाखल्यांचे रॅकेट:मोहाळे बंधूंवर गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत होणार चौकशी, एसआयटी अहवालानंतर कारवाई

यवतमाळ जिल्ह्यात २७ हजार बनावट नोंदी आढळल्याची घटना ताजी असताना आता अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील आलेगाव येथे बनावट जन्म दाखल्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालात गंभीर . एका वर्षात १,१०१ बोगस दाखले देऊन जमवलेल्या काळ्या पैशांतून मोहाळे बंधूंनी गावात ६० लाख रुपयांचा आलिशान बंगला उभारल्याचा आरोप…

Read Full News

देशभरात 1 वर्षात 9 हजार बियाणे नमुने फेल:महाराष्ट्र, एमपीत जास्त, पीक खराब झाल्यास शेतकऱ्याला भरपाई मिळण्याचा हक्क हवा

Marathi News National 9 Thousand Seed Samples Failed In 1 Year Across The Country; More In Maharashtra, MP, Farmers Should Have The Right To Compensation If The Crop Is Damaged सना एजाज | नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात बियाण्यांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवूनही मोठ्या प्रमाणावर बियाणी मानकांवर योग्य उतरत नसल्याचे समोर आले आहे. चालू आर्थिक…

Read Full News

राज्यामध्ये 22 संशयित परदेशी वैद्यकीय पदवीधर:सायबर यंत्रणेकडून सखोल तपासाला सुरुवात

परदेशी वैद्यकीय पदवीधरांच्या नोंदणीमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या ऑनलाइन नोंदणी पोर्टलमध्ये छेडछाड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परिषदेने तातडीने दखल घेतली असून, महाराष्ट्र सायबरमार्फत सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची भूमिका परिषदेने स्पष्ट केली आहे. परिषदेच्या अंतर्गत तपासणी आणि नोंदणी अभिलेखांच्या छाननीदरम्यान ही अनियमितता उघडकीस…

Read Full News

करुण अंत:पुण्यात इलेक्ट्रिक हीटिंग बॅगचाशॉक लागून अभियंत्याचा मृत्यू, दोन दिवसांनंतर दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस

मानेच्या दुखण्यावर आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याची इलेक्ट्रिक हीटिंग बॅग मानेखाली ठेवून झोपणे एका तरुणाच्या जिवावर बेतले. झोपेतच हीटिंग बॅगमधून विजेचा जोरदार धक्का बसल्याने ३० वर्षीय संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला. वडगाव शेरी परिसरातील एका सोसायटीत घडलेली ही धक्कादायक घटना दोन दिवसांनंतर दुर्गंधी सुटल्याने उघडकीस आली. रोहन कुबडी (३०) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. रोहन पुण्यातील एका…

Read Full News

उदे गं अंबे उदे…:श्रीकृष्ण-जांबुवंत युद्ध, कोल्हापूरच्या अंबाबाईचे उपपीठ ते महालक्ष्मीचे प्रकटीकरण; जाणून घ्या कडेठाणच्या मंदिराची अनोखी गाथा!

महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यातले कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता आणि माहूरची (नांदेड) रेणुका माता ही तीन पूर्णपीठे, तर वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. अगदी त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 44 किलोमीटवर असणारी कडेठाणची महालक्ष्मी माता हे कोल्हापूरच्या अंबाबाईचे उपपीठ म्हणून ओळखले जाते. श्रीकृष्णाचे जांबुवंताच्या मुलीसोबत लग्न झाले. त्यानंतर त्यांनी जांबुवंतीसह…

Read Full News

कप केकमध्ये रबर-प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रार:FDA ची रॉयल बेकर्सवर कारवाई, परवाना निलंबित

बेकरीतून खरेदी केलेल्या कप केकमध्ये रबर किंवा प्लास्टिकसारखे तुकडे आढळल्याची तक्रार समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरात असलेल्या मे. रॉयल बेकर्स अँड कन्फेक्शनर्स या बेकरीचा परवाना प्रशासनाने निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांच्या पालनातील त्रुटी आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. पुढील…

Read Full News

DU मध्ये दुसऱ्यांदा कुलगुरू होणारे पहिले VC:योगेश सिंह यांनी 8 ऑक्टोबरपासून दुसरा कार्यकाळ सुरू केला, जाणून घ्या संपूर्ण प्रोफाइल

दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सलग दुसरा पाच वर्षांचा कार्यकाळ सुरू केला आहे. या पदावर पुन्हा पूर्ण कार्यकाळासाठी नियुक्त होणारे ते पहिले भारतीय आहेत. दुसरा कार्यकाळ २०३१ मध्ये पूर्ण होईल त्यांची पुनर्नियुक्ती पाच वर्षांत पूर्ण झाल्यास ते ऑक्टोबर २०३१ पर्यंत दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू राहतील. त्यामुळे कुलगुरू म्हणून त्यांचा एक दशकाचा कार्यकाळ…

Read Full News

बारामुल्लाच्या जंगलात शस्त्रसाठा जप्त:निळ्या ड्रममध्ये लपवून ठेवलेला होता AK-47, पिस्तूल, ग्रेनेड, IED आणि स्फोटकांचा साठा

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील जंगलातून शस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटक साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. सोपोर पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उत्तर काश्मीरमधील सोपोर परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. ही मोहीम मुकाम चेहरहारच्या जंगलात राबवण्यात आली. शोधादरम्यान एका मोठ्या दगडाखाली लपवलेला निळ्या रंगाचा ड्रम आणि एक बॅग सापडली. संशयित स्फोटकांची तपासणी…

Read Full News

मणिपूरमध्ये हिंसाचार भडकला, 5 जणांचा मृत्यू:अतिरेक्यांनी पोलिस ठाणे आणि घरे पेटवली; यावर्षी झालेल्या घटनांमध्ये 40 हून अधिक मृत्यू

मणिपूरच्या कामजोंग आणि उखरुलमध्ये शनिवारी सशस्त्र गटांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र, माजी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी ७ जण मारले गेल्याचा दावा केला आहे. दरम्यान, एका पोलिस ठाण्याला आग लावण्यात आली आहे. नागाबहुल कामजोंगमधील कुकीबहुल चसाड गावात २२ वर्षीय तरुण आणि ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिलेला गोळी मारण्यात आली होती….

Read Full News