‘तू माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही’:लग्न ठरल्याच्या रागातून इंजिनिअर तरुणीची हत्या, कोल्हापुरातील घाटात नेमकं काय घडलं?
एकतर्फी प्रेम, संशय आणि मालकी हक्काच्या भावनेतून महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असताना कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी परिसरात एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीचा विवाह दुसऱ्या व्यक्तीशी ठरल्याच्या रागातून तिच्या प्रियकराने तिला दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून,…