Headlines

ऊसाला प्रतिटन 5,500 रुपये द्या, अन्यथा ऊसतोड होऊ देणार नाही:राजू शेट्टींचा सरकारला इशारा! जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत 12 ठराव मंजूर

यंदाच्या ऊस गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन 5,500 रुपये दर मिळालाच पाहिजे, अन्यथा ऊसतोड होऊ देणार नाही आणि साखर कारखानेही सुरू करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी घेतला आहे. जयसिंगपूर येथे झालेल्या संघटनेच्या 25 व्या ऊस परिषदेत ऊसदर, साखर उद्योगातील आर्थिक अडचणी, दुष्काळी परिस्थिती, कृषिपंपांची वीजबिले आणि शेतकऱ्यांच्या…

Read Full News

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 81 केंद्रांवर मतदान:विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाची मान्यता, 23 ऑक्टोबरला होणार मतदान

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भातील ८१ केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी पाठवलेला प्रस्ताव निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांमध्ये ही ८१ मतदान केंद्रे आहेत. येत्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत शिक्षक मतदार…

Read Full News

अमरावती एडीसीसी बँकेवर प्रशासक राज सुरू:श्रीनिवास पांढरे प्रशासक म्हणून नियुक्त, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (एडीसीसी) प्रशासक राज सुरू झाले आहे. सहकार विभागातील सहनिबंधक श्रीनिवास पांढरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपला. निवडणूक लांबल्याने प्रशासनात पोकळी निर्माण झाली. अध्यक्ष आमदार बच्चू कडूंसह ११ संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली. त्यामुळे प्रशासक राज…

Read Full News

आमदार नितीन देशमुख यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भाजपने केला निषेध:अमरावतीत आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी, व्हिडिओची चौकशीची मागणी

अमरावती: राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी कथित अपमानास्पद वक्तव्य केले. याचा भारतीय जनता पार्टीच्या अमरावती महानगर शाखेने निषेध केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आमदार देशमुख यांच्यावर कठोर कारवाईची मागणी भाजपने केली. त्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. समाज माध्यमात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, आमदार देशमुख बाळापूर येथील सरकारी…

Read Full News

पुसला बसस्थानकावर स्वच्छतागृहाअभावी महिला प्रवाशांची गैरसोय:युवा मित्र मंडळाने जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

वरुड तालुक्यातील पुसला हे मोठे गाव असून, आजूबाजूच्या अनेक लहान गावांचे प्रवासी येथील बसस्थानकाचा वापर करतात. मात्र, येथे स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांची, विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येवर पुसला येथील युवा मित्र मंडळाने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी बसस्थानकावर स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांना उघड्यावरच शौचास…

Read Full News

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच वर्षी मंडळाचा अनोखा उपक्रम:पारंपरिक बैलजोड्यांच्या साथीने नवदुर्गा देवीचे आगमन, शहरात मिरवणुकीची रंगली चर्चा

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चोपडा शहरात नवदुर्गा देवीच्या आगमनासाठी काढण्यात आलेल्या एका आगळ्यावेगळ्या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पाटील गढी परिसरातील गुरुदत्त नवदुर्गा मंडळाने पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत 3 आकर्षक सजवलेल्या बैलजोड्यांच्या साहाय्याने देवीची मूर्ती मंडळापर्यंत आणली. ढोल-ताशांचा गजर, महिलांचा नाच-गाण्यातील उत्स्फूर्त सहभाग, सजवलेल्या बैलजोड्या आणि भक्तिमय वातावरण यामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. आधुनिकतेच्या काळात पारंपरिक…

Read Full News

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 1 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी, शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकारकडून विलंब केला जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही, तर पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी शनिवारी सातारा येथे दिला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना…

Read Full News

सातारा बसस्थानकात खळबळ!:सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला; चहा टपरीवर करत होते काम

सातारा बसस्थानक परिसरात शनिवारी दुपारी एका वृद्धाचा मृतदेह सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. नंदू क्षणमुखखैया हिरेमठ (वय 65, रा. सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सातारा बसस्थानक परिसरातील एका चहा टपरीवर काम करत होते. बसस्थानकातील सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये त्यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत…

Read Full News

रुपयाची घसरण रोखण्यासाठी RBI चा प्लॅन:सरकारी तेल कंपन्यांसाठी विशेष डॉलर विंडो सुरू, फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगचे नियम कडक

डॉलरच्या तुलनेत सातत्याने कमजोर होत असलेल्या भारतीय रुपयाला सावरण्यासाठी आणि मनी मार्केटमधील चढ-उतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी RBI ने दोन निर्णय घेतले आहेत. RBI ने सरकारी तेल कंपन्यांच्या डॉलरच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एक ‘स्पेशल डॉलर विंडो’ सुरू केली आहे. याशिवाय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगशी संबंधित नियमही अधिक कडक केले आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते,…

Read Full News

अजय देवगणचा सर्वात मोठा चित्रपट ठरला दृश्यम-3:400 कोटींचा टप्पा पार, 8 दिवसांत सिंघम-तान्हाजीचा विक्रम मोडला, जाणून घ्या कोणत्या स्टार्सपेक्षा अजूनही मागे

२ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या दृश्यमः द कॉन्क्लूजन अर्थात दृश्यम ३ ने अवघ्या ८ दिवसांत जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अजय देवगणच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघम अगेनच्या नावावर होता. या चित्रपटाने एकूण ३८९ कोटी रुपयांची जगभरातील कमाई केली…

Read Full News