Headlines

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोरेंसह पाच जणांवर गुन्हा:एमपीएससी आंदोलनात विनापरवाना ड्रोन उडवल्याने; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा, 50 हजारांचे साहित्य जप्त

एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता पोलिसांच्या कारवाईचेही वळण मिळाले आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनाचे विनापरवाना ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे ड्रोन आणि रिमोट कंट्रोलर…

Read Full News

नवरात्रोत्सवामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल:तांबडी जोगेश्वरी, चतु:शृंगी, भवानी माता, महालक्ष्मी मंदिर परिसरात गर्दीमुळे अनेक रस्ते बंद

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक बदल करण्यात आले आहेत. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. या भागातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. ‘नवरात्रौत्सवात बुधवार पेठेतील श्री तांबडी जोगेश्वरी…

Read Full News

बालेवाडीत ‘मानुषेर माझे माँ’ संकल्पनेतून दुर्गापूजा महोत्सव:16 ते 21 ऑक्टोबरदरम्यान, माणुसकीचा संदेश; बंगाली खाद्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

आधुनिकता आणि पारंपरिकतेचा संगम साधणारा सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचा शारदीय दुर्गापूजा महोत्सव १६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान बालेवाडी हायस्ट्रीट येथील साफा बँक्वेट्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून, यंदा ‘मानुषेर माझे माँ’ अर्थात ‘माणसांमध्ये आई’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. या माध्यमातून माणुसकी, कृतज्ञता आणि पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव…

Read Full News

देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे का?:सुप्रिया सुळे म्हणाल्या-विमानात घुसून तरुणांना अटक करणे ही संविधानाची हत्या; हात जोडून विनंती, आमच्या मुलांना सोडा!

“देशात शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या हक्कांची मागणी करणाऱ्या तरुणांवर गुन्हेगारांसारखी कारवाई केली जात आहे. विमानामध्ये प्रत्यक्ष घुसून कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे हे अत्यंत चुकीचे, बेकायदेशीर आणि संविधानाची उघड हत्या करणारे आहे. पाठीवर बॅकपॅक घेऊन रस्त्यावरून चालणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांनाही संशयावरून उचलले जात आहे. हे चित्र पाहता देशात ‘अघोषित आणीबाणी’ सुरू झाली आहे का, अशी तीव्र…

Read Full News

बनावट सिमकार्ड, म्युल अकाउंट शोधण्याची मोहीम व्यापक:सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून मोहीम; उपायुक्त निलेश पालवे यांची माहिती

बनावट सिमकार्ड शोधणे आणि म्युल अकाउंट यांचा शोध घेऊन ती बंद करण्याची मोहीम महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून हाती घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त निलेश पालवे यांनी दिली. सायबर गुह्यांना आळा घालण्यासाठी ही मोहीम अधिक व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘शिखाज् कारीगरी’ आणि केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग…

Read Full News

गणित सुटले नाही म्हणून 8 वर्षांच्या मुलीला मारहाण:चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा, खाऊ-झोपू शकत नाही, शाळेत मुले झाडू मारत आहेत

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात गणिताचा प्रश्न सोडवता न आल्याने शिक्षकाने ८ वर्षांच्या विद्यार्थिनीला मारहाण केली. शिक्षक भागचंद चतुर्वेदी यांनी मुलीच्या गालावर आणि कानाजवळ चापट मारल्या, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा पडल्या. या घटनेनंतर मुलगी घाबरलेली आहे. शिक्षकाने रागाच्या भरात मारहाण केल्याचे मान्य करत माफी मागितली आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, घटनेनंतर मुलगी नीट अन्न-पाणी घेत नाही…

Read Full News

दुय्यम निबंधकपदी निवडलेल्या 48 उमेदवारांची नियुक्ती सुरू करा:SIT चौकशीला पाठिंबा; प्रामाणिक उमेदवारांचे भविष्य अडचणीत आणू नका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट-ब (अराजपत्रित) परीक्षा २०२५ अंतर्गत दुय्यम निबंधकपदी निवड झालेल्या ४८ उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गैरप्रकारांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यास पूर्ण पाठिंबा असून, केवळ संशयाच्या आधारावर प्रामाणिक उमेदवारांची नियुक्ती रोखू नये, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या भरतीची जाहिरात २९…

Read Full News

चित्रपट निर्मितीत स्वतःचा अनुभव मांडा:संतोष डावखर म्हणाले, यामुळेच ‘गोंधळ’ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला; मुंबा महोत्सवात कलाकारांशी संवाद

आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी चित्रपट निर्मितीची प्रक्रिया काय असते हे जाणून घेऊन ‘गोंधळ’ चित्रपटाची निर्मिती केली. तुम्ही जितके गुंतागुतींचे चित्रपट बनवायला जाता तितके ते तुमच्या कथानकाला हानीकारक ठरतात. चित्रपटाच्या माध्यमातून विषय मांडताना तुमचा स्वत:चा अनुभव मांडणे अधिक प्रभावी ठरते. या गोष्टीचा साकल्याने विचार करून मराठी मातीतल्या ‘गोंधळ’ या विषयाची निवड केली आणि हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Read Full News

पोटाला चिरा न देता श्वानाच्या मूत्राशयातील कर्करोगाच्या गाठी काढल्या:15 वर्षांच्या एंजलवर नैसर्गिक मूत्रमार्गातून उपचार; डॉक्टरांचा भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा

गेल्या सहा महिन्यांपासून लघवीतून रक्तस्राव होत असलेल्या १५ वर्षांच्या ‘एंजल’ या शिह त्झू जातीच्या श्वानाच्या मूत्राशयातील कर्करोगाच्या दोन गाठी काढण्यात पुण्यातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांना यश आले. अवघे ५.६ किलो वजन आणि वाढते वय लक्षात घेऊन पोटाला चिरा न देता नैसर्गिक मूत्रमार्गातून दुर्बिणीच्या साहाय्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतात श्वानावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच केल्याचा दावा…

Read Full News

गरम पाण्याच्या पिशवीतून विजेचा धक्का, संगणक अभियंत्याचा मृत्यू:वडगाव शेरीत मानेखाली इलेक्ट्रिक पिशवी ठेवून झोपलेला रोहन कुबडी मृतावस्थेत आढळला

गरम पाण्याची इलेक्ट्रिक पिशवी मानेखाली ठेवून झोपलेल्या ३० वर्षीय संगणक अभियंता तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. सदनिकेतून दुर्गंधी आल्याने रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदनिकेचा दरवाजा उघडला. तेव्हा संगणक अभियंता मृतावस्थेत सापडला. त्याच्या उशाखाली इलेक्ट्रिक गरम पाण्याची पिशवी सापडली. विजेच्या धक्क्याने त्याचा…

Read Full News