Headlines

Rohit Pawar Accuses Pune Police Of Blocking MPSC Student Accounts

एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाने आता राजकीय वळण घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेतील काही त्रु . आंदोलनाची जागा आणि याचिकाकर्त्याचे ‘भाजप’ कनेक्शन आंदोलनामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याच्या आरोपांना उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “आमच्याकडे अलका…

Read Full News

हिंगोलीच्या फटाका गोदामातील आगीत आणखी एकाचा मृत्यू:अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या 3 वर

हिंगोली शहरातील कपडागल्ली भागातील फटाका गोदामातील आग प्रकरणात हिंगोली पालिकेच्या अग्नीशमनदलातील कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला आहे. या घटनेत मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर इतर 10 जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंगोली शहरातील कपडागल्ली भागातील गोपाल बासटवार याच्या घरातील गोदामात फटाके साठवून ठेवण्यात आले होते. या गोदामाला सोमवारी ता.५ रात्री आठ वाजण्याच्या…

Read Full News

चोंढी पेट्रोल पंपावरील खून प्रकरण:एका महिलेसह 5 जणांवर खूनाचा गुन्हा दाखल, आरोपींची शोध मोहिम सुरुच

वसमत तालुक्यातील चोंढी येथे इंडियन ऑईलचा पेट्रोलपंप सील करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या विक्री विभागातील व्यवस्थापकावर खंजरने सातवेळा वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांवर बुधवारी ता. ७ कुरुंदा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read Full News

राहुल-प्रियंका यांच्यासह विरोधी खासदारांवर FIR:आकाशवाणी भवनात घुसल्याचा आरोप; 8 तास धरणे दिले होते; खरगे यांच्या घरी विरोधी खासदारांची बैठक

दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी भवनात जबरदस्ती घुसल्याच्या आरोपावरून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आकाशवाणीच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. खरं तर, मंगळवारी विरोधी खासदार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि SIRच्या निषेधार्थ निवडणूक आयोगापर्यंत ‘सेव्ह डेमोक्रसी’ मार्च काढत होते. पोलिसांनी मार्गात बॅरिकेड्स लावले आणि नेत्यांना बसमध्ये बसवून…

Read Full News

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:केंद्राकडे 17 हजार 500 कोटींचा प्रस्ताव; पिकांसाठी 13 हजार कोटी, चाऱ्यासाठी 4500 कोटींची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुधनासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १७ हजार ५०० कोटी रुपयांचा अंतरिम आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. दुष्काळामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि निर्माण झालेली चारा टंचाई लक्षात घेऊन ही मदत मागण्यात आली आहे. पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार कोटी दुष्काळामुळे खरीप…

Read Full News

प्रश्न ऐकताच रिपोर्टरवर भडकल्या जया बच्चन:भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोट यांनी लगावला टोला; म्हणाल्या- अखेर सांगायचं काय आहे

दिल्लीमध्ये मंगळवारी इंडिया ब्लॉकच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने केली. या मोर्चात समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चनही सहभागी झाल्या. निदर्शनांदरम्यान जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका वृत्तवाहिनीशी बोलण्यास नकार देताना त्या माईक मागे ढकलताना दिसल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. त्यानंतर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोट यांनी जया…

Read Full News

तहसीलचे पथक कागदावरच:पैठणच्या गोदावरी नदीतून रोज 200 ब्रास वाळूचा उपसा; प्रशासनाचे दुर्लक्ष

पैठण परिसरातील गोदावरी नदीपात्रातून गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळूचा बेसुमार उपसा पुन्हा एकदा जोमात सुरू झाला आहे. पैठणच्या उत्कृष्ट दर्जाच्या वाळूला स्थानिक बाजारासह अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या लगतच्या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः सोन्याचा भाव मिळत आहे. त्यामुळे वाळू तस्करांची नजर पुन्हा एकदा या समृद्ध नदीपात्रावर पडली असून, दररोज शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे….

Read Full News

सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण, 72,600 वर:निफ्टीही 150 अंकांनी घसरला; ऑटो आणि मेटल शेअर्समध्ये अधिक विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच ७ ऑक्टोबरला घसरण झाली आहे. सेन्सेक्स ४०० अंकांहून अधिक घसरणीसह ७२,६०० वर व्यवहार करत आहे. त्याचवेळी निफ्टीमध्येही सुमारे १५० अंकांची घसरण झाली असून, तो २२,६००च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, मेटल आणि कंझ्युमर ड्यूरेबल्सच्या शेअर्समध्ये अधिक घसरण झाली आहे. आशियाई बाजारांत आज घसरण अमेरिकन बाजारात ६ ऑक्टोबरला वाढ झाली होती परदेशी…

Read Full News

मैफल:कवितांतून शेती, माणुसकीसह उमटले नात्यांचे भावस्पर्शी संवेदनशील विश्व

जोतिबा फुले यांचा सामाजिक संघर्ष, दुष्काळाच्या काळात पावसासाठी शेतकऱ्यांची आर्जव, बापाचे कुटुंबातील स्थान आणि शेतकरी-शेतमजुरांच्या स्थलांतराचे वास्तव अशा विविध विषयांचे संवेदनशील चित्रण निफाड येथे झालेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात कवितांमधून उमटले. राज्यभरातून आलेल्या ८० कवींनी शेती व शेतकरी, माणुसकी, आई, स्त्रीजीवन, नाती, निसर्ग आणि मानवता अशा विविध विषयांवरील कविता सादर करत काव्यमैफिल रंगवली. माणुसकी सामाजिक फाउंडेशनच्या…

Read Full News

मोदींनी दिल्लीतील श्री विनायक मंदिरात केली पूजा:आज सार्वजनिक जीवनात 25 वर्षे पूर्ण; देशभरातील कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल संवाद साधणार

पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील श्री विनायक मंदिरात पूजा-अर्चना केली. त्यांनी आज सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण केली आहेत. म्हणजेच ते गेल्या २५ वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या मोठ्या पदावर आहेत. यानंतर पंतप्रधान सकाळी १० वाजता देशभरातील कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल माध्यमातून संवाद साधतील. दरम्यान, पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित ‘वाराणसी ते वडनगर सेवा…

Read Full News