चंद्रभागेत उघड्या पडलेल्या 4 ट्रेलर गणेशमूर्तींचे:नगरपालिकेने मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवल्या, नगराध्यक्षा उतरल्या नदीपात्रात
गणेशोत्सवाच्या काळात पंढरपूरच्या चंद्रभागा वाळवंटातील विसर्जन कुंडात तसेच नदी पात्रात, पाण्यात विसर्जित करण्यात आलेल्या शेकडो गणेशमूर्ती पाणी कमी झाल्याने उघड्यावर पडल्या आहेत. मूर्तींची विटंबना होऊ नये, यासाठी पंढरपूर नगरपालिकेने तातडीने मूर्ती संकलनाची मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाळवंटातील उघड्यावर पडलेल्या गणेशमूर्ती बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवल्या. आतापर्यंत चार ट्रेलरमधून ५०० हून अधिक गणेशमूर्ती…