Headlines

जान्हवी कपूरने जीभ 360 अंशात फिरवण्यास टॅलेंट म्हटले:पॅरिस फॅशन वीकमध्ये केले विधान; सोशल मीडियावर झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या पॅरिस फॅशन वीक २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्समध्ये आहे. यावेळी एका मुलाखतीत तिने आपल्या एका विचित्र कौशल्याचा खुलासा केला. जान्हवीने सांगितले की, ती आपली जीभ जवळपास ३६० अंशांपर्यंत वाकवू शकते. मात्र, तिने स्वतःच हे करणे मूर्खपणाचे आणि निरुपयोगी असल्याचे म्हटले. असे असूनही सोशल मीडियावर युजर्सनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली….

Read Full News

पंप, केबल चोरीविरुद्ध रास्ता रोको:संतप्त शेतकऱ्यांनी अडवला जामनेर-फत्तेपूर मार्ग; पोलिसांविरुद्ध प्रचंड रोष‎

लाखो रुपये किंमत असलेल्या वीज पंपाच्या केबल वारंवार चोरीस जात आहेत. यामुळे मोठे नुकसान झाल्याने लोणी येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी अचानक जामनेर-फत्तेपूर रोडवर रास्ता रोको केला. जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतापासून तर पाणी उचलायचा ठिकाणापर्यंत केबल टाकून वीज पंप बसविले आहेत. मात्र किंमती तांब्यासाठी केबल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे शेतकऱ्यांचे तिहेरी नुकसान होत…

Read Full News

चांदवड‎:दुर्गेश ह्याळीज याने ‘इस्त्रो’मध्ये मिळवला ‘बेस्ट इंटर्न’चा बहुमान

येथील जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी दुर्गेश ह्याळीज याने ‘इस्रो’मधील इंटर्नशिपमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. १७ जून ते १८ ऑगस्टदरम्यान इंटर्नशिप पूर्ण करत त्याने देशभरातील ४० विद्यार्थ्यांमधून ‘बेस्ट इंटर्न’ हा बहुमान पटकावला. सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत दुर्गेशने इस्रोच्या थेट संशोधन प्रकल्पांवर काम केले. कोडिंगमधील कौशल्य आणि प्रकल्पातील प्रत्यक्ष योगदानाची इस्रोच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी…

Read Full News

संसद 54 दिवस सत्रावसान न होता कार्यरत:37 वर्षे जुना विक्रम मोडला; बैठकीच्या अटकळी, 13 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी स्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज संपून जवळपास दोन महिने होणार आहेत, मात्र अधिवेशन औपचारिकरित्या अद्याप संपलेले नाही. लोकसभा आणि राज्यसभा 13 ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्या होत्या. मंगळवारपर्यंत अधिवेशन समाप्तीची अधिसूचना जारी झालेली नसल्याने अधिवेशन समाप्त झाले नाही. दोन्ही सभागृहे एकाच वेळी अधिवेशन समाप्त न होता राहण्याचा हा सर्वात प्रदीर्घ कालावधी आहे. यापूर्वी 1989…

Read Full News

मोबाईलच्या अतिवापरापासून डोळे जपा:अभोण्यात डॉ. संजना‎आहेर यांचे आवाहन‎‎

मोबाईलचा वापर कमी करण्यासोबतच ‘२०-२०-२०’ नियमाचे पालन करावे. संगणक किंवा मोबाईलवर काम करताना दर वीस मिनिटांनी वीस फूट अंतरावरील वस्तूकडे वीस सेकंद पाहावे, असा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. संजना आहेर यांनी दिला. डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर, हिरव्या पालेभाज्या व फळांचा आहारात समावेश करावा, रात्री पुरेशी झोप घ्यावी, विनाकारण डोळे चोळू नयेत तसेच वर्षातून एकदा नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी…

Read Full News

कळवण तालुक्यात रस्ते खड्ड्यांत:रोटरी क्लबनेच घ्यावी दुरूस्ती हाती

रोटरी क्लबचे सचिव नितीन संचेती यांना पत्र प्रतिनिधी | कळवण तालुक्यातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, शाळकरी मुले, प्रवासी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वारंवार तोंडी व लेखी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ कळवणने पुढाकार घेऊन रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद…

Read Full News

जलजीवनच्या विहिरीची जागा ठरेना; टाकीचे काम उरकले:लखमापूरला ४ वर्षांपासून रखडली योजना; काम अपूर्ण मात्र 50% निधी अदा

लखमापूर गावासाठी जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेली नळ पाणीपुरवठा योजना चार वर्षांपासून रखडली असताना विहिरीची जागाच निश्चित नसल्याने योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विहीर व पंपहाऊससाठी जागा निश्चित होण्यापूर्वीच जलकुंभ व एका वस्तीतील पाइपलाइनचे काम करण्यात आले असून, ५० टक्के बिल अदा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यातच विहीर व पंपहाऊससाठी जमीन दानपत्राद्वारे घेण्याचा…

Read Full News

यूपीच्या लखनऊत 40 हजार घरे बुडाली:बिहारच्या 8 जिल्ह्यांत पावसाची शक्यता, उत्तराखंडच्या अल्मोडा-उत्तरकाशीत गारपीट

उत्तर प्रदेशात 10 नद्या दुथडी भरून वाहत आहेत. लखनऊ आणि सीतापूरसह 7 जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. लखनऊत गोमती नदीची पाणीपातळी सलग आठव्या दिवशी वाढत आहे. फैजुल्लागंज परिसरातील 40 हजार घरांमध्ये 5 ते 6 फूटांपर्यंत पाणी साचले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत बिहारच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण…

Read Full News

पोलिस उपनिरीक्षकाच्या कारची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार:दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल; उपनिरीक्षक जखमी‎

दिंडोरी-वणी राज्यमार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत लखमापूर येथील कामगाराचा जागीच मृत्यू झाला. शिवदत्त सुखदेव शिंदे (रा. लखमापूर) असे मृताचे नाव असून, ते लखमापूर येथील कंपनीत कार्यरत होते. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक संतोष छगन कडाळे यांच्याविरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवदत्त शिंदे हे दुचाकी…

Read Full News

खामगाव गोरक्ष येथे दुष्काळी पंचनाम्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; अधिकारी परतले:नुकसानग्रस्तांना सरसकट आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी‎

फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथे दुष्काळग्रस्त पिकांच्या पंचनाम्यावरून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनातर्फे पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाला ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आक्रमक विरोध करत माघारी धाडले. सोमवारी सकाळी सहाय्यक कृषी अधिकारी कैलास चौधरी आणि ग्रामविकास अधिकारी जी. एस. गावंडे हे कर्मचारी पूर्ण शिवारातील पिकांचा पंचनामा करण्यासाठी गावात दाखल झाले…

Read Full News