Headlines

एसआयआर : राज्यात 2 कोटी नावे कट:दुरुस्तीसाठी केवळ 6.24 लाख अर्ज, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले जिल्हानिहाय आकडे

महाराष्ट्रात विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत मसुदा मतदार यादी प्रसिद्धीनंतर ३६ जिल्ह्यांमध्ये नवीन मतदार, आक्षेप आणि नाव, फोटो आदी दुरुस्तीसाठी ६ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. पुण्यात सर्वाधिक ५६,६०५ अर्ज आले आहेत. मसुदा यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली. त्यात ९,७८,५४,०४९पैकी ७,७१,६५,५६२ मतदारांचा यादी समावेश करून २,०६,८८,४८७ म्हणजेच २१.१४ टक्के मतदारांची नावे वगळण्यात आली होती….

Read Full News

दिव्य मराठी फोटो इन्व्हेस्टिगेशन:जोडरस्त्यांसाठी जमीन खरेदी न करताच 20 कोटींचा पूल उभारला; परभणीत घरे, कब्रस्तानासमोर पूल परिणाम : 25 गावांना 40 किमी फेरा

पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे गावालगत गोदावरी नदीवर २०२० मध्ये पुलाचे बांधकाम सुरू झाले. या कामावर २० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, पूल उभारण्यापूर्वी जोडरस्त्यांसाठी जमीन अधिग्रहण केले नाही. प्रशासनाच्या चुकीमुळे घरे, प्लॉट व कब्रस्तानसमोर पुलाची उभारणी झाली. त्यामुळे जोडरस्त्याला जागा देण्यास स्थानिकांनी नकार दिला. नदीला पूर आल्यानंतर २.५ लाख ग्रामस्थांना फेरा गोदावरी नदीला पूर…

Read Full News

पुण्यात आंदोलनांचा धडाका:नोटीस मिळूनही पोलीस आयुक्तांची ठोस भूमिका नाही ?, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलने, उपोषणे, निदर्शने आणि मोर्चांचे सत्र सुरू आहे. विद्यार्थी, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांकडून सातत्याने आंदोलने केली जात असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. काही आंदोलनांमुळे प्रमुख रस्ते, चौक आणि मार्गांवर वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनांबाबत…

Read Full News

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर:नितेश पवारच्या चौकशीतून कर्नाळा अभयारण्याजवळ लपवलेले पिस्तूल आणि मोबाइल जप्त

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वाची दिशा मिळाली आहे. हत्या होऊन आठवडा उलटल्यानंतर पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्याजवळून एक पिस्तूल आणि मोबाइल फोन जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या नितेश पवार याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. महामार्गालगत एका पडक्या झोपडीच्या मागील बाजूस झुडपांमध्ये हे पिस्तूल…

Read Full News

14 वर्षीय मुलाचा शेतात अंत्यविधी:नांदुरा खुर्दला स्वातंत्र्याची 80 वर्षे उलटूनही स्मशानभूमी नाही, गावकऱ्यांमध्ये संताप

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नांदुरा (खुर्द) गावात स्मशानभूमी नसल्याने एक गंभीर समस्या समोर आली आहे. स्वातंत्र्याची 80 वर्षे उलटूनही या गावाला हक्काची स्मशानभूमी मिळालेली नाही. यामुळे अथर्व गौतम गवई या 14 वर्षीय मुलाचा अंत्यविधी त्याच्या वडिलांच्या शेतात करावा लागला. अथर्वचा अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गावात अधिकृत स्मशानभूमी नसल्याने कुटुंबावर ही वेळ आली….

Read Full News

पुण्यात आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल:ज्ञानेश कुमार आणि विवेक भीमनवारयांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. तसेच दोघांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली. ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणारच’ आदित्य…

Read Full News

तिवसा येथे दुष्काळी परिस्थितीत चारा वाहतूक भोवली:10 लाखांचा 7 टन चारा जप्त, अमरावती जिल्ह्यात पहिलीच कारवाई, तिघांवर गुन्हा

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी १० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमरावती जिल्ह्यात चारा वाहतुकीवर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अमरावतीसह राज्यात चाराबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरांसाठी हिरवा, वाळलेला चारा, गवत आणि वैरण जिल्ह्याबाहेर नेण्यास…

Read Full News

अमरावतीत पाणी कपातीचे आदेश, शेतीसाठी उपसाबंदी:जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक; पिण्याच्या पाण्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय

राज्य शासनाच्या दुष्काळामुळे १० टक्के पाणी कपातीच्या निर्णयाचे अमरावतीत पडसाद उमटले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शेतीसाठी पाणी उपशावर बंदी घालण्याचा निर्णय झाला. याबाबतचा आदेश उद्या, बुधवारी जारी केला जाईल. पिण्याच्या पाण्याबाबतचे धोरणही एक-दोन दिवसांत जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून प्रस्ताव मागवला आहे. अमरावती शहर आणि…

Read Full News

जि. प. कर्मचारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार एक दिवसाचे वेतन:अमरावतीसह राज्यभरातील लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय

अमरावती जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय घेतला आहे. अमरावती जिल्हा परिषदेतील कर्मचारी त्यांचे एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहेत. संघटनेचे कार्याध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा एक भाग आहे. अमरावतीसह राज्यभरातील सर्व लिपीकवर्गीय…

Read Full News

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा:प्रत्येक जिल्ह्यात वीजयंत्रणा मजबूत होणार, 20 कोटींच्या निधीला मंजुरी

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुरळीत आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळावा, यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी 20 कोटी रुपयांपर्यंतचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निधीतून नवीन वितरण रोहित्रे, स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर आणि कॅपॅसिटर…

Read Full News