Headlines

हर्षदा देशमुख-जाधव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला:महाविकास आघाडीच्या उमेदवार, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज भरला

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) विधानभवनात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पदवीधरांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता रोजगार, कौशल्यविकास आणि शैक्षणिक संधींच्या माध्यमातून ठोस काम करण्याचा अजेंडा घेऊन निवडणूक रिंगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले. अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

Read Full News

हवामान बदल भविष्याचा नव्हे, आजचा प्रश्न; पृथ्वी अतिदक्षता विभागात:पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे मत, विकासाची दिशा बदलण्याची गरज

हवामान बदल हा भविष्यातील प्रश्न नसून आजच्या पिढीसमोरील गंभीर संकट आहे. पृथ्वीची पर्यावरणीय प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असून तिची अवस्था अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या रुग्णासारखी झाली आहे. निसर्गाशी असलेले आपले नाते समजून घेण्याची गरज असताना विकासाच्या जुनाट संकल्पनांमुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. भविष्यातील पिढ्यांना निरोगी पर्यावरण द्यायचे असेल तर विकासाची दिशा आणि जीवनशैली बदलणे अपरिहार्य…

Read Full News

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी 30 उमेदवारांनी भरले अर्ज:आज छाननी होणार, 9 ऑक्टोबरला निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २० उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे सादर केली. यापैकी सहा जणांनी यापूर्वीही अर्ज भरले होते. या उमेदवारांमध्ये शिवसेना, भाजप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी, बळीराजा पार्टी, समाजवादी गणराज्य पार्टी, भारतीय जनसम्राट पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी…

Read Full News

तुकाराम मुंडेंच्या आदेशानंतर धुळ्यात FDA ची धडक:80,208 पेट बॉटल्स जप्त, प्रयोगशाळा अहवालाची प्रतीक्षा

सणासुदीच्या काळात बाजारात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पेयांच्या गुणवत्तेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) लक्ष केंद्रित केले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या तपासणी मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत मोठी कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एका पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निर्मिती आस्थापनेची तपासणी करून तब्बल 80 हजार 208…

Read Full News

विवाहितेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग:पतीला फोटो पाठवल्याचा आरोप, तरुणाला अटक

मैत्रीचा फायदा घेत विवाहितेशी प्रेमसंबंध निर्माण करून तिचे 70 हून अधिक व्हिडिओ काढल्याचा आणि नंतर ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार डोंबिवलीतील शिरढोण परिसरात समोर आला आहे. महिलेने संबंध पुढे ठेवण्यास नकार दिल्यानंतर संबंधित तरुणाकडून तिला त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर आरोपीने महिलेच्या पतीला तिचे काही फोटो पाठवल्याचेही…

Read Full News

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीला आता माघारीचा रंग:162 अर्ज वैध, 10 उमेदवारांचे अर्ज बाद

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता निवडणुकीच्या रणधुमाळीला माघारीच्या टप्प्याचे वेध लागले आहेत. छाननीत एकूण 162 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 10 उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील प्रमुख राजकीय गटांमधील दिग्गज उमेदवारांची उमेदवारी कायम राहिली आहे. आता माघारीच्या कालावधीत कोण उमेदवारी…

Read Full News

चोंढीत पेट्रोलपंप सील करण्यावरून वाद:इंडियन ऑईलच्या व्यवस्थापकाचा खंजरने 7 वार करून खून

वसमत तालुक्यातील चोंढी येथे पेट्रोलपंप सील करून ताब्यात घेण्यासाठी आलेल्या इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि पेट्रोलपंप चालकाच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाल्यानंतर कंपनीच्या विक्री विभागातील व्यवस्थापकाचा खंजरने वार करून खून करण्यात आला. मंगळवारी (6 ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. महेश शेळके असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांच्यावर खंजरने तब्बल 7 वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी…

Read Full News

सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात रविवारपासून सार्वजनिक नवरात्रोत्सव:नारीशक्तीचा सन्मान, अष्टलक्ष्मी मिरवणूक, जिवंत देखावा व सामूहिक गरब्याचे आयोजन

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने रविवार, ११ ऑक्टोबरपासून मंगळवार, २० ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल असलेल्या या उत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रविवारी सकाळी ९ वाजता बेलराईज इंडस्ट्रीज…

Read Full News

रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्यव्यवस्थेकडे पाहण्याची गरज:ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत

“आरोग्यसेवा ही केवळ उपचार करण्याची प्रक्रिया नसून, ती समाजाच्या संवेदनशीलतेची कसोटी आहे. रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्यव्यवस्थेकडे पाहण्याची गरज आज अधिक तीव्र झाली आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. रुग्ण हक्क परिषदेने समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची शिकवण पेरल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित…

Read Full News

पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी वाढ:पहिल्या आठ महिन्यांत तब्बल 44 टक्क्यांची वाढ, आंतरराष्ट्रीय कार्गो तीन पटींहून अधिक

पुणे आणि परिसरातील वाढत्या औद्योगिक व व्यावसायिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळाने कार्गो वाहतुकीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत पुणे विमानतळावरून ४५,०५०.७ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी करण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ ४३.९ टक्के आहे. विशेष म्हणजे २०२६ मधील या आठही महिन्यांत कार्गो वाहतुकीत सातत्याने वाढ…

Read Full News