परिसरात दहशत:पट्टेरी वाघाकडून हल्ल्याचा शेतकऱ्याचा दावा; वन विभाग म्हणतो, ठसे तपासणार
बागलाण तालुक्यातील जायखेड्यातील मेळवण शिवारात सोमवारी (दि. ५) रात्री वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. लाडे कुटुंबाने पट्टेरी वाघाने आपल्यावर चाल केल्याचा दावा केला असून, त्याच रात्री यशवंत चिंतामण शेवाळे यांच्या गोठ्यात दोन बकरे व एका वासरावर हल्ला झाला. मात्र, नाशिक जिल्ह्यात वाघाच्या अस्तित्वाची कोणतीही नोंद नसल्याने हल्ला करणारा प्राणी नेमका पट्टेरी वाघ आहे की…