Headlines

हिंगोलीतील 50 वर्षाची साधना अवघ्या 10 मिनीटात जळून खाक:तंबोरा, हार्मोनियम, तबला, गिटार जळाले; घटनास्थळावरील दृश्य पाहून विद्यार्थ्यांचेही डोळे पाणावले

हिंगोली शहरात मागील 50 वर्षापासून संगीत साधना विद्यालयाच्या माध्यमातून संगीताचे धडे देणाऱ्या विद्यालयातील तंबोरा, हार्मोनियम, तबला, गिटार जळून खाक झाले. मागील 50 वर्षापासूनची संगीत साधना अवघ्या दहा मिनीटात जळून खाक झाली. मंगळवारी (ता. 6) गायनाचे धडे घेणाऱ्या शिष्यांचे घटनास्थळावरील परिस्थिती पाहून डोळे पाणावले. हिंगोली शहरातील कपडा गल्ली भागातील अनुराधा नांदेडकर ह्या संगीत साधना विद्यालयाच्या माध्यमातून…

Read Full News

शिवसेना पक्ष-चिन्ह, आमदार अपात्रतेचा खटला:विधिमंडळ बहुमत की पक्षसंघटना? सर्वोच्च न्यायालयात खडाजंगी; शिंदे गटाचा युक्तिवाद, पुढील दोन दिवस सलग सुनावणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील उभी फूट, आमदार अपात्रता आणि पक्षनाव व ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वाटपावरून सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा एकदा अत्यंत टोकदार कायदेशीर युक्तिवाद पाहायला मिळाला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी 10 जानेवारी 2024 रोजी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यास दिलेला नकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्याचा घेतलेला…

Read Full News

World Bank Upgrades India GDP Growth Forecast to 7.1% for FY27

नवी दिल्ली26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज वाढवून 7.1% केला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये जागतिक बँकेने FY27 साठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 6.6% राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. संस्थेने मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आपल्या ताज्या ‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट’ अहवालात ही माहिती दिली आहे. जागतिक व्यापार आणि जगभरातील…

Read Full News

CM Shaurya Padak & CM Srushti Scheme Launched

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (6 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली असून, या बैठकीत राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे 7 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. . आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय: – पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी “मुख्यमंत्री शौर्य पदक” मिळणार. कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी रोख पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार,…

Read Full News

मुंबईत ड्रग्जचा विळखा!:मैदानात खेळत असलेल्या चिमुकल्याच्या मानेत टोचले नशेचे इंजेक्शन, बर्वेनगरमधील धक्कादायक प्रकार

राज्यात महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, मुंबईत नशेखोर आणि अमली पदार्थांचा विळखा किती गंभीर झाला आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. घाटकोपर परिसरातील बर्वेनगरमध्ये एका 12 वर्षीय विद्यार्थ्याच्या मानेत नशेखोरांनी थेट नशेचे इंजेक्शन टोचल्याचा अत्यंत धक्कादायक आणि भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ड्रग्जमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पावर मोठे प्रश्नचिन्ह…

Read Full News

रोटरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड:पुणे येथे 4 ते 6 डिसेंबर 2026 दरम्यान तिसरे संमेलन होणार

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी साहित्यविश्वात दलित साहित्याला वैचारिक, सामाजिक आणि सौंदर्यशास्त्रीय परिमाण देणारे लेखक, कवी, कादंबरीकार, साहित्य समीक्षक, सरस्वती सन्मानप्राप्त लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल रो. नितीन ढमाले आणि संमेलन प्रमुख रो. मधुमिता बर्वे यांनी दिली आहे. संमेलनाचे यंदाचे तिसरे वर्ष…

Read Full News

भाजपने म्हटले-SCने फॉर्म 6 अटॅचमेंट योग्य ठरवले:SIR वर सर्व निवडणूक आयुक्त सहमत; काल EC ने राहुल यांचे फॅक्ट चेक केले

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, फॉर्म 6 मध्ये निवडणूक आयोगाने कोणताही बदल केलेला नाही, फक्त संलग्नक जोडले आहे. ते म्हणाले की, 27 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, SIR साठी फॉर्म 6 पुरेसा नाही. त्यामुळे यासोबत निवडणूक आयोगाने आणखी काही कागदपत्रेही जारी करावीत. त्यांनी दावा केला की,…

Read Full News

बनावट मेसेज व्हायरल झाल्याने संतापले जावेद अख्तर:CJP-अभिजीत दिपके यांच्यावर टीकेचे दावे खोटे असल्याचे सांगितले, म्हणाले- माझ्या नावाचा वापर का?

जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो संदेश पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले आहे. या संदेशात त्यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि तिचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर टीका केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा दावा फेटाळून लावला. अभिजीत दिपके आणि CJP वर टीका करण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर का केला…

Read Full News

'सामान्यांसाठी जिवंतपणी मरण पत्करायला निघालोय':पदवीधरसाठी रमेश पाटलांनी तिरडीवरून जात भरला उमेदवारी अर्ज

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांचे वेध लागले असून, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत आता केवळ राजकीय नेतेच नाही, तर सामाजिक कार्यकर्ते, तरुण उद्योजक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही मैदानात उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी अनोख्या पद्धतीने आपला अपक्ष उमेदवारी अर्ज…

Read Full News

83% दुकानदार UPI चार्ज देण्यास तयार नाही:खर्च ग्राहकांवर टाकला तर 86% लोक UPI पेमेंट करणार नाहीत; लोकलसर्कल्सचे सर्वेक्षण

83% दुकानदार 15 ऑक्टोबरपासून लागू होणारे UPI शुल्क भरण्यास तयार नाहीत. त्याचवेळी, दुकानदारांनी हा खर्च ग्राहकांवर टाकल्यास 86% लोक UPIद्वारे पेमेंट करणार नाहीत. अशा परिस्थितीत एकूण व्यवहारांमध्ये 10% आणि पेमेंटच्या संख्येत 4% घट होऊ शकते. लोकलसर्कल्सने यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. नव्या नियमांनुसार, 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI मर्चंट पेमेंटवर 0.4% शुल्क…

Read Full News