शरद पवारांचा दुष्काळी भागाचा पाहणी दौरा:म्हणाले- शेतकरी संकटात, सरकारने तातडीने मदत करावी; कर्जमाफी, वीजबिल माफीसह 5 प्रमुख मागण्या
राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला आहे. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. आज पुरंदर तालुक्यातील ‘परिंचे’ गावात त्यांनी गावकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. या दौऱ्यात शरद पवार यांनी…