अप्पर वर्ध्यात 58 टक्के पाणीसाठा; पर्जन्यमान 376.20 मीमीने घटले:उन्हाळ्यात नागरिकांची ‘अग्निपरीक्षा'', पाणी आरक्षणावर फेरविचार
अमरावती जिल्ह्याची ‘जीवन वाहिनी’ समजल्या जाणाऱ्या मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा (नल-दमयंती सागर) धरणातील जलसाठ्यात यावर्षी मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणातील जलसाठा तब्बल ४०.५२ टक्क्यांनी खाली आल्यामुळे आगामी उन्हाळ्यात अमरावतीसह आसपासच्या ग्रामीण भागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती घोंघावत आहे. या पार्श्वभूमीवर धरणातून शेती आणि उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या आरक्षणावर जलसंपदा विभागाला फेरविचार…