पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीवर गुन्हा दाखल:परवाना नसल्याने आरटीओचे नागरिकांना आवाहन, 5 वाहनांवर कारवाई करत दंड आकारला
रॅपिडो कंपनीने पुणे जिल्ह्यात बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ॲग्रीगेटर परवाना प्राप्त केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. परवान्याविना बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेसाठी असलेल्या भ्रमणध्वनीवरील अनुप्रयोगाचा वापर करू नये, असे आवाहन पुणे…