Headlines

किसान सभेचा अकोले-मुंबई वाहन लॉग मार्च शहापुरात स्थगित:शेतकरी, आदिवासी, कामगारांच्या मागण्यांवर सरकारचे आश्वासन, 4 नोव्हेंबरला पुन्हा बैठक

शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, महिला आणि ग्रामीण कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने सुरू केलेल्या अकोले ते मुंबई वाहन लॉग मार्चला शहापुरात तात्पुरता विराम देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन सरकारकडून आश्वासने मिळाल्यानंतर किसान सभेने हा निर्णय घेतला. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान…

Read Full News

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची साडेसात तास चौकशी:AI ऑडिओ क्लिप, निवडणुकीतील वाद अन् संतोष कनोजियाबाबत काय म्हणाल्या?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची विशेष तपास पथकाने (SIT) सुमारे साडेसात तास चौकशी केली. निवडणुकीच्या काळातील कथित धमकीची ऑडिओ क्लिप, पूर्णेकर यांच्यासोबत असलेले राजकीय मतभेद, मुख्य हल्लेखोर संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली याच्याशी असलेले संबंध आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावरील आरोप अशा विविध मुद्द्यांवर तपास अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारल्याची माहिती…

Read Full News

साखर कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक होणार:आकाश फुंडकरांचे आश्वासन, बेमुदत संप तूर्त स्थगित

साखर उद्योगातील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहकार व कामगार विभागाची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असून, कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक विचार करून मार्ग काढण्याचे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहे. या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य साखर कामगार…

Read Full News

पाकिस्तानमध्ये भारतीय वस्तूंची आयात 69% वाढली:बंदी असूनही 3 महिन्यांत ₹5,876 कोटींचा माल खरेदी; UAE चे लेबल लावून व्यापारी विक्री करत आहेत

भारतासोबतच्या व्यापारावरील बंदी असूनही पाकिस्तानमध्ये भारतीय वस्तूंची मागणी झपाट्याने वाढली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) नुसार, आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या 3 महिन्यांत (जुलै-सप्टेंबर) पाकिस्तानने भारताकडून 61.74 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 5,876 कोटी रुपयांच्या वस्तू आयात केल्या आहेत, ज्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 69% अधिक आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत पाकिस्तानने 3,478 कोटी रुपयांच्या भारतीय…

Read Full News

नाशिकमध्ये 28 वर्षीय इंजिनीअरची आत्महत्या:प्रेमसंबंधातील दुरावा, पैशांचा वाद आणि मारहाणीच्या त्रासाने पवन हताश

नाशिकमध्ये एका 28 वर्षीय तरुण इंजिनीअरने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पवन राजेंद्र पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, तो काही महिन्यांपूर्वीच नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. प्रेमसंबंधातील दुरावा, तरुणीला दिलेल्या पैशांवरून निर्माण झालेला तणाव, तसेच काही तरुणांकडून झालेली कथित मारहाण आणि धमक्यांमुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता, अशी माहिती…

Read Full News

SC चा सवाल- ॲसिड विक्रीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे, तरीही हल्ले का:याचा अर्थ- धोरण अपयशी ठरले; राज्यांनी ते कठोरपणे लागू करावे, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ॲसिड हल्ल्यांच्या घटनांशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत, तरीही घटना घडत आहेत. याचा अर्थ त्यात काही त्रुटी आहेत. न्यायालयाने सरकारला ॲसिडच्या विक्रीवर बंदी घालणारी मार्गदर्शक तत्त्वे सर्व राज्यांमध्ये लागू करण्यास सांगितले. तसेच प्रतिज्ञापत्र दाखल करून ॲसिडचा गैरवापर रोखण्यासाठी कोणती आवश्यक पावले उचलली…

Read Full News

ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीज सादर, किंमत 1.39 लाखांपासून:हॅसलब्लॅडच्या सहकार्याने ट्रिपल 200 मेगापिक्सेल कॅमेरा, पॅड मिनी, एन्को एक्स 4 आणि पॉवर बँकही लॉन्च

ओप्पो इंडियाने प्रीमियम स्मार्टफोन श्रेणीत नवीन फाइंड एक्स १० सिरीज सादर केली आहे. यामध्ये ओप्पो फाइंड एक्स १० आणि फाइंड एक्स १० प्रो मॅक्स या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. या सिरीजची सुरुवातीची किंमत १ लाख ३९ हजार ९९९ रुपये आहे. हॅसलब्लॅडच्या सहकार्याने विकसित केलेली कॅमेरा प्रणाली, मोठी बॅटरी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सुविधांवर कंपनीने…

Read Full News

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक:‘गृहमंत्र्यांना 100 दिवस कोठडीत ठेवू शकता, मग मिनाक्षी शिंदेंना अटक का नाही?’ पुतणीचा सवाल

ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला महिना उलटूनही या प्रकरणातील कथित सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबीयांचा संताप वाढला असून, त्यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘राज्याचे पोलीस एका गृहमंत्र्याला 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात, तर मग मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक का करू शकत नाहीत?’ असा सवाल…

Read Full News

प्रवाशांना गुंगीच्या गोळ्या देऊन लुटणाऱ्याला अटक:मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार उज्जैनमधून ताब्यात, दीड लाखांचे सोने जप्त

एसटी प्रवासादरम्यान शेजारील प्रवाशांना बोलून विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना गुंगीकारक गोळ्या खायला देउन लुट करणार्‍या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीची सोन्याची लगड, गुंगीच्या गोळ्यांची दोन पाकिटे असा ऐवज जप्त केला आहे. बाबू भुरेखान ( ६३ रा. मंदसौर, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला…

Read Full News

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजन विचारे, केदार दिघे आक्रमक:तपास अधिकाऱ्यांना घेरले, कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील तपासाला गती मिळावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी ठाण्यात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. या प्रकरणातील तपासाबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पूर्णेकर कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. याचवेळी पोलीस ठाण्याबाहेर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. माजी खासदार राजन विचारे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी…

Read Full News