Headlines

भीमाशंकरचे जंगल वाचवा; सिल्लोडच्या विद्यार्थ्यांचा मानवी साखळीमधून संदेश:शाळेतील मैदानावर रेखाटले शेकरू वन्यजीवाचे चित्र

भीमाशंकरच्या जंगलात जलविद्युत प्रकल्पाकरिता होत असलेल्या वृक्षतोडीमुळे व त्यामुळे विस्थापित होणाऱ्या वन्यजीवांमुळे नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर भीमाशंकर अभयारण्यात अधिवास असलेला महाराष्ट्राचा राज्य प्राणी व हरित मानचिन्ह असलेला शेकरू हा वन्यजीव व त्याचे नैसर्गिक जंगल वाचवण्याचा संदेश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सिल्लोड येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. पर्यावरण संवर्धक व राष्ट्रीय स्वयंसेवक…

Read Full News

जलजीवन मिशनअंतर्गत 1.26कोटी खर्चूनही खंडाळा येथे नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा:खंडाळ्यात जलजीवन मिशनअंतर्गत 1.26कोटी खर्च, ‘हर घर जल’चा नारा फोल

वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात सध्या नळाद्वारे पिवळसर, गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने येथील ग्रामस्थांना हेच दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून, गावात सा . केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ या योजनेसाठी खंडाळा गावात तब्बल १ कोटी २६ लाख ७०…

Read Full News

एफडीएची कारवाई:किचनमध्ये उंदीर, अन्न जमिनीवर; 5 हाॅटेल, 1 गृहउद्योग, 2 कॅन्टीनचे परवाने निलंबित, अन्न तयार करण्यासाठी गंजलेल्या उपकरणांचा वापर

‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने शहरातील आणि औद्योगिक वसाहतींमधील हॉटेल्स आणि कॅन्टीनवर मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत, अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्न शिजवणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ प्रमुख बड्या हॉटेल्स, बेकरी आणि इंडस्ट्रियल कॅन्टीनचे परवाने अन्न सुरक्षा मानके कायदा, २००६ च्या कलम ३२(३) नुसार निलंबित केले. एफडीएच्या तपासणीदरम्यान…

Read Full News

Notice on Form-6 also; Court said – will examine all aspects, hearing on SIR, Commission’s functioning

Marathi News National Notice On Form 6 Also; Court Said – Will Examine All Aspects, Hearing On SIR, Commission’s Functioning नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये एसआयआरदरम्यान मतदार नोंदणीच्या फॉर्म-६ मधील कथित बदलाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी नव्या याचिकेत आरोप केला आहे की, आयोगाने ऑनलाइन…

Read Full News

पूर्णेकर हत्या प्रकरण:29 दिवसांनंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी, एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आंदोलनाचा प्रयत्न

उबाठा नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २९ दिवस उलटूनही मुख्य सूत्रधारांचा छडा न लागल्याने ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. मंगळवारी या प्रकरणात दोन मोठ्या घडामोडी घडल्या. एकीकडे माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांची ठाणे गुन्हे शाखेत ७ तास चौकशी करण्यात आली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ‘शुभ-दीप’ या…

Read Full News

टोरेंट प्रकल्प 100% पर्यावरणपूरक असल्याचा दावा:कर्जतमधील वृक्षतोड प्रकरणातराजकीय हेतूने आरोप- फडणवीस

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कर्जत तालुक्यात टोरेंट कंपनीचा ३ हजार मेगावॅट वीज उत्पादन प्रकल्प १०० टक्के पर्यावरणपूरक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, या प्रकल्पाला अभ्यासाविना विरोध होत आहे. विरोधामागे राजकीय हेतू आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले की, कागदावर कमी झाडे दाखवून प्रत्यक्षात ६ ते ७ लाख वृक्षांचा बळी दिला जातोय. मुख्यमंत्री म्हणाले की,…

Read Full News

मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटला 90 नव्हे, 365 दिवस लागणार:मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटाेद्यात मनाेज जरांगेंना दिलेले गोपनीय पत्र ‘दिव्य मराठी’च्या हाती

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी २९ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू केलेले आंदोलन १६ सप्टेंबरला पाटोद्यात स्थगित केले होते. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंनी जरांगेंना २ पानी पत्र अन् १४ पानांचा अहवाल दिला होता. ‘दिव्य मराठी’च्या हाती हे १६ पानांचे पत्र आले आहे. त्यातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सरकारने दिलेली आश्वासने अन् प्रत्यक्षात खूपच तफावत आहे….

Read Full News

संभाजीनगरात बजाज रुग्णालयावर सायबरहल्ला:9 सर्व्हर हॅक करून खंडणीची मागणी, डार्क वेबच्या ‘टॉर’ वेबसाइटवर माहिती उघड करण्याची धमकी

छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज रुग्णालयावर ‘क्रिप्टो २४ ग्रुप’ या आंतरराष्ट्रीय टोळीने ‘रॅन्समवेअर’ सायबर हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. हॅकर्सनी रुग्णालयाच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये घुसखोरी करून सर्व ९ मुख्य सर्व्हर हॅक करत अत्यंत संवेदनशील डेटा ‘एन्क्रिप्ट’ (लॉक) केला आहे. डेटा पूर्ववत करण्यासाठी हॅकर्सनी खंडणीची मागणी केली असून, पैसे न दिल्यास संपूर्ण रुग्णालय तसेच रुग्णांची माहिती…

Read Full News

मंत्रिमंडळ निर्णय:1.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून 5 हजार रु. जमा होणार, 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत

केंद्र सरकारकडून दुष्काळी मदतनिधी मिळण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे अग्रिम मदतीपोटी प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने १४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला होता. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम रक्कम…

Read Full News

मराठवाडा पदवीधरमध्ये रा.काँग्रेसचे डॉ. पाटील 10,003 मतांनी पुढे:3.00 वा. 1,01,519 मतांची मोजणी पूर्ण, निकालाकडे सर्वांचे लक्ष

विधान परिषदेच्या 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला झालेल्या मतदानाची मोजणी 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू झाली. विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतपत्रिकांवर प्राधान्यक्रमाने मतदान होते. त्यामुळे मतमोजणी संथगतीने सुरू होती. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात रात्री 3 वाजता दीड फेरी पूर्ण झाली. त्यावेळी 1,01,519 मतांची मोजणी झाली होती. त्यापैकी 93,136 मते वैध ठरली, तर…

Read Full News