आता खतासाठी मोबाईलवरून करता येणार आगाऊ बुकिंग:बागलाणमध्ये ‘एफएफएस’ प्रणाली लागू; क्यूआर कोड दाखवा अन् खत घेऊन जा, शेतकऱ्यांना अवाहन
कृषी सेवा केंद्रांसमोर लागणाऱ्या लांबच लांब रांगा, खताच्या एका गोणीसाठी उन्हातान्हात होणारी पायपीट आणि वारंवार होणारी हुज्जत… हे दर हंगामात बळीराजाच्या पाचवीला पूजलेले चित्र आता इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत. बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‘एफएफएस’ (फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल) ही नवी डिजिटल प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे आता घरबसल्या मोबाईलवरूनच खतांचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे….