Headlines

चांदीने सोन्यालाही टाकले मागे; वर्षात 40% उसळी:विटा-नाण्यांकडे 65% कल, एक लाखावरून घसरणीनंतरही तेजी कायम

पारंपरिक गुंतवणुकीत नेहमी सोन्याच्या सावलीत राहिलेल्या चांदीने चालू वर्षात सोन्याला परताव्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. एमसीएक्सच्या आकडेवारीनुसार, यंदा सोन्याने सुमारे ३०% परतावा दिला असताना चांदीने ४० टक्क्यांपेक्षा जास्त झेप घेतली आहे. उच्च पातळीवर झालेल्या नफेखोरीमुळे डिसेंबर फ्यूचर्समध्ये १.७२% ची घसरण होऊन भाव ९६,१७० प्रतिकिलोवर आले असले तरी बाजारातील दीर्घकालीन आघाडी कायम आहे. सौरऊर्जा (सोलार पॅनल),…

Read Full News

‘500 कोटींच्या क्लिप’च्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन; सूत्रे बलकवडेंकडे:आंतरवालीत 3 वर्षांपूर्वी लाठीमारानंतर बलकवडेंकडेच एसपी पदाचा कार्यभार होता

मनोज जरांगेंनी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या आॅडिओ क्लिपचे सत्य शोधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून एसआयटी स्थापन झाली आहे. १ सप्टेंबर २०२३ रोजी आंतरवालीत लाठीमारानंतर तत्कालीन जालना पोलिस अधीक्षक तुषार दोशींना हटवून या पदाची सूत्रे शैलेश बलकवडेंकडे देण्यात आली होती. तेच बलकवडे (सध्या द. प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त) ३ सदस्यीय एसआयटीचे प्रमुख असतील. पथकात…

Read Full News

गुवाहाटीतील हॉटेलमध्ये गोळीबार, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू:आरोपीने हॉटेल लीजवर घेतले होते, मालकांसोबत सुरू होता वाद

आसामच्या गुवाहाटी येथे सोमवारी रात्री एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीने ६ जणांवर गोळीबार केला. यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा समावेश आहे. त्यात हॉटेल मालकाची पत्नी आणि मुलाचाही समावेश आहे. ही घटना बोरा सर्व्हिस एरियातील बिलास इन हॉटेलमध्ये घडली. पोलीस आयुक्त पार्थ सारथी महंत यांनी सांगितले की,…

Read Full News

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या 60 फेऱ्या रद्द; मुंबईकर ‘रुळा’वर:ट्रॅकवर उतरलेल्या तरुणाचा लाेकलच्या धडकेत मृत्यू

मध्य रेल्वेवर सोमवारी सलग दोन तांत्रिक बिघाडांमुळे तब्बल ९ तास वाहतूक खोळंबली. लाखो चाकरमान्यांचे हाल झाले. दुसरीकडे लोकल ठप्प झाल्याने भांडुपजवळ रुळावरून चालणाऱ्या एका तरुणाला एसी लोकलने चिरडले. यामुळे ६० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या, तर रस्त्यावर पर्यायी वाहनांअभावी रिक्षाचालकांनी प्रवाशांची आर्थिक लूट केली. सकाळी ९:२३ वाजता मुलुंड-ठाणे मार्गावर ओव्हरहेड वायरवर तार पडली. हे काम…

Read Full News

महाराष्ट्रातील एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका:राज्यात 2 कोटी मतदारांची नावे कट; कोर्टाची आयोगाला नोटीस

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान तब्बल २ कोटी ६ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळल्याच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून उत्तर मागितले…

Read Full News

BJP’s Jan Aakrosh rally across the country, Kharge should apologize, his statement is hurtful

Marathi News National BJP’s Jan Aakrosh Rally Across The Country, Kharge Should Apologize, His Statement Is Hurtful Rajnath नवी दिल्ली/पाटणा9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने सोमवारी देशभरात निदर्शने केली. भाजपने खरगे यांचे वक्तव्य अशोभनीय आणि अपमानास्पद असल्याचे सांगत त्यांच्याकडे माफीची मागणी केली आहे….

Read Full News

नवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध:बदनामीच्या भीतीने वडिलांनी केली विवाहित मुलीची हत्या, हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगून अंत्यसंस्कार

प्रेमसंबंध आणि समाजातील प्रतिष्ठेच्या प्रश्नातून एका पित्याने आपल्या विवाहित मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. मुलीचे पतीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी तिला समज दिली होती. मात्र, त्यानंतरही ती प्रियकराला भेटण्यासाठी गेल्याने संतापलेल्या वडिलांनी तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या…

Read Full News

Maharashtra HSC Exam Registration Crisis; UDISE Technical Glitch Hits Students

बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. अकरावीमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेतल्यामुळे UDISE प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या 18,534 विद्यार्थ्यांना बारावीचा परीक्षा अर्ज भरताना अडचणी येत असल्य . राज्यातील आठ विभागांमधील 1,218 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने झाल्याचे समोर आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांची UDISE प्रणालीमध्ये नोंदणी नसल्याने त्यांना बारावीचा…

Read Full News

‘सरकार इस्टेट एजंट झाल्यासारखे वागत आहे’:भीमाशंकरजवळील वृक्षतोडीचा वाद ताजा असतानाच ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्यावरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर घणाघात

राज्यात पर्यावरण आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्याच्या जमिनीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. एका खासगी विकासकाच्या फायद्यासाठी ठाणे आणि मुंबईच्या सीमेवरील फ्लेमिंगो अभयारण्याशी संबंधित 143 एकर जमीन संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याच्या हालचाली सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी…

Read Full News

गुवाहाटीतील हॉटेलमध्ये गोळीबार, 4 जणांचा मृत्यू:यामध्ये एका महिलेचा समावेश; रिसेप्शनजवळ मृतदेह आढळले

आसाममधील गुवाहाटी येथे सोमवारी रात्री एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ही घटना बोरा सर्व्हिस एरियातील बिलास इन हॉटेलमध्ये घडली. घटनेनंतरचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामध्ये रिसेप्शनजवळ लोकांचे मृतदेह पडलेले दिसत आहेत. घटनेशी संबंधित २ छायाचित्रे… हल्लेखोरांनी सहा जणांच्या गटावर गोळीबार केला प्राथमिक अहवालांनुसार,…

Read Full News