Headlines

सह्याद्री नष्ट करणारं हे मानवी राक्षसांचं सरकार:कर्जत वृक्षतोडीवरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- ही लढाई थांबणार नाही

कर्जत तालुक्यातील टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून विरोधक आक्रमक झाले असून, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्य सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. “दोनशे वर्षे वयाची झाडे ज्या निर्दयीपणे कापली जात आहेत, हे कृत्य एखादा मानवी राक्षसचं करू शकतो, आणि हे सरकार अशाच मानवी राक्षसांचे आहे,” असा घणाघाती…

Read Full News

पोस्ट टाकण्याचे 500 मिळतात, पण डिलीट करायलाही पैसे मिळतात:एका फोनवर राज ठाकरेंनी पोस्ट डिलीट केली, सुजात आंबेडकरांचा आरोप

भाजप आणि काँग्रेसचे लोक 500 रुपये घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करतात, कमेंट करतात आणि इतरांना ट्रोल करतात. पण आता एक नवीन पॅटर्न समोर आला आहे. मुंबईतील एक मोठे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या किंवा गौतम अदानी यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राज ठाकरेंना ती पोस्ट डिलीट करावी लागली….

Read Full News

4 राज्यांतील 28 MLC जागांचे निकाल आज:बिहारमध्ये 8 जागा, 150 उमेदवार; यूपीत BJP-SP मध्ये लढत; 23 ऑक्टोबरला झाली निवडणूक

उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विधान परिषदेच्या म्हणजेच MLCच्या 28 जागांचे निकाल आज जाहीर होतील. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. या जागांसाठी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान झाले होते. बिहारमधील 8 जागांसाठी 150 उमेदवार रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 11 जागांवर भाजप आणि समाजवादी…

Read Full News

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत मोठा गोंधळ:8 मतपेट्यांना सील नसल्याचा मविआचा आक्षेप; मतमोजणी काही काळ थांबवली

राज्यभरातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या ५ जागांसाठी आज मतमोजणी होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. मात्र, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर आज सकाळी मोठा गोंधळ उडाला. मतमोजणी केंद्रात आलेल्या ८ मतपेट्यांना सील नसल्याचा गंभीर आक्षेप महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव यांनी घेतला. या आक्षेपामुळे आणि…

Read Full News

पत्नीला नांदायला पाठवण्याच्या कारणावरून वाद:जळगावात मेहुण्याने शालकाची केली हत्या, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात एका कौटुंबिक वादातून मेहुण्याने 21 वर्षीय शालकाच्या गळ्यावर कटरने वार करून खून केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. महिन्याभरापासून माहेरी आलेल्या पत्नीला नांदायला पाठवा, या मागणीसाठीच्या बैठकीत हा वाद विकोपाला गेला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीसह त्याचे आई-वडील, भाऊ, काकू आणि चुलतभाऊ अशा सहा…

Read Full News

कौशल्याची चुणूक:बालमावळ्यांनी मातीत घडवला "स्वराज्याचा इतिहास', कुरणवस्ती जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणपूरक रतनगड किल्ला

मातीचे ढिगारे, वेगवेगळ्या आकारांचे दगड, मातीच्या तोफा, हातात भगवे ध्वज घेतलेले मावळे आणि किल्ल्यावर डोलणारे नैसर्गिक धान्य… अशा देखण्या मांडणीतून शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरणवस्तीच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक रतनगडाची प्रतिकृती साकारली आहे. आठ दिवसांच्या मेहनतीतून उभ्या राहिलेल्या या पर्यावरणपूरक किल्ल्यात विद्यार्थ्यांची कल्पकता, सांघिक कार्य आणि इतिहासाविषयीची आवड ठळकपणे दिसून येते. आदर्श गाव…

Read Full News

संतांचे विचार प्रत्येकाने जीवनात आचरणात आणण्याची खरी गरज:ईश्वर महाराज कदम यांचे निरुपण; श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर भाविकांची गर्दी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा दिली. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात संतांचे विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हभप ईश्वर महाराज कदम यांनी केले. श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड येथे आयोजित करण्य . २३ ऑक्टोबरपासून श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर धार्मिक उत्सवाला सुरुवात झाली असून ज्ञानेश्वरी पारायण, भजन, हरिपाठ, कीर्तनसेवा आणि महाप्रसाद…

Read Full News

ट्रेलरमध्ये उसाच्या मोळ्या व्यवस्थित न बांधल्याने राष्ट्रीय महामार्गावर सडा:शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, रस्त्यात पडलेल्या उसामुळे घडतात अपघात

सध्या २०२६-२७ च्या ऊस गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहे. बोअर, विहिरींच्या पाण्याचे स्रोत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस हा अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. अशा स्थितीत लवकरात लवकर कारखाना ऊस गळीतास घेऊन जाईल, त्यांना सध्या ऊस तोडणी देण्यास शेतकऱ्याने सुरुवात केली…

Read Full News

अकलूजमध्ये दांडिया-गरब्यात महिलांनी धरला फेर:महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने नृत्याविष्कारांनी भरली मैफल, दोन गटात स्पर्धा

येथील महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘वीरशैव लिंगायत महिला गरबा-दांडिया स्पर्धा रविवारी येथील पाटीदार भवनात पार पडल्या. पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, गरबा-दांडियाच्या तालावर रंगलेली नृत्याविष्कारांची मैफल आणि वि . सोनिया गुळवे, अक्षदा गवसणे जेत्या : स्पर्धेत लहान गटात अनुक्रमे सोनिया गुळवे, आरोही ढवळसकर, व वैष्णवी गोटे तर मोठ्या गटात अक्षदा गवसणे, श्रेया गुळवे…

Read Full News

मुंबई लोकल 10 तास ठप्प; ट्रॅकवर 3 मृतदेह आढळले:प्रवाशांना रुळांवरून चालावे लागले, विक्रोळी-ठाणे मार्गावरील सिग्नल यंत्रणा बिघडली होती

मुंबईत सोमवारी रेल्वे रुळांवर तीन जणांचे मृतदेह आढळले. खरं तर, मुंबईत सोमवारी अनेक लोकल गाड्या १० तासांपर्यंत अडकून राहिल्या आणि प्रवाशांना रुळांवरून चालत जावे लागले. त्यानंतर संध्याकाळी रुळांवर मृतदेह आढळले. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील ही अडचण सकाळी १० वाजता कांजूरमार्ग स्थानकाजवळ लागलेल्या आगीमुळे निर्माण झाली. त्यानंतर विक्रोळी-ठाणे मार्गावरील सिग्नलिंग यंत्रणा बिघडली. वृत्तांनुसार, घाटकोपर-विक्रोळी विभागात दोन जण…

Read Full News