चक्रीवादळाने ढगाळ हवामान; 29 ला पाऊस:सूर्याचे दक्षिणायन पूर्ण होईपर्यंत थंडी नाही; नोव्हेंबरपासून थंडी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलली आहे. त्याचा थेट परिणाम विदर्भातील वातावरणावर जाणवू लागला आहे. दक्षिण भारतातून पुढे सरकणारे ढग मालेगाव, छत्रपती संभाजीनगरमार्गे अकोला, यवतमाळ व चंद्रपूरच्या दिशेने येत आहेत. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातून पूर्व विदर्भाजवळून मध्य प्रदेशाच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे अकोल्यात आकाश ढगाळ राहील. २८, तसेच प्रामुख्याने २९ ऑक्टोबर रोजी अकोला…