कुस्तीच्या आखाड्यात यश सुरुडे यास सुवर्ण:राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी
कुर्डुवाडी-माढा, जिल्हा सोलापूर येथे झालेल्या महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावचा युवा मल्ल यश सुरुडे याने प्रतिस्पर्धी कौस्तुभ कुलकर्णी याच्यावर १३ विरुद्ध ५ अशा गुणांनी मात करत सुवर्णपदक पटकावले. या विजयामुळे यशला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे उभाडे गावासह संपूर्ण इगतपुरी तालुक्याची मान उंचावली आहे. कुर्डुवाडी-माढा येथे…