तरुणांचे ब्रेनवॉश, जैशच्या हस्तकाला मुंबईत अटक:एटीएसच्या सायबर सेलने पाळत ठेवून कारवाई
मुंबईतील माहिमच्या गजबजलेल्या भागात अत्तर विकणारा आणि बाइक रायडर म्हणून फिरणारा तरुण प्रत्यक्षात पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहंमद’ या दहशतवादी संघटनेसाठी स्लीपर सेलप्रमाणे काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) काळाचौकी युनिटने शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून मोहंमद हसन अबू सरमद अख्तर (वय ३३) याला माहिम मेट्रो स्थानकाजवळील लक्ष्मी बिल्डिंगमधून अटक केली. पंतप्रधान नरेंद्र…