शिर्डी–हैदराबाद विमानसेवेत वाढ; आजपासून दोन अतिरिक्त उड्डाणे:दिवसभरातील विमानांचे लँडिंग-टेकऑफ मिळून 12 ऑपरेशन्स
नवनाथ दिघे | शिर्डी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या दक्षिण भारतातील भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिर्डी–हैदराबाद हवाई मार्गावर रविवारपासून (दि. २५ ऑक्टोबर) दोन अतिरिक्त विमानसेवा सुरू होत आहेत. त्यामुळे शिर्डी विमानतळावरील विमानांच्या दररोजच्या लँडिंग आणि टेकऑफ ऑपरेशन्सची संख्या आठवरून १२ होणार आहे. सध्या शिर्डीहून हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली या शहरांसाठी इंडिगोच्या विमानसेवा सुरू आहेत….