संमेलन म्हणजे नाथांची सेवा ही गावोगावी पोहोचवण्याची सुरुवात:निफाडमध्ये नवनाथांच्या जयघोषाने दोन दिवसीय भक्तीच्या महाकुंभाची सांगता
त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व निफाड येथील केंद्राच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय संमेलनात अवघे निफाड ‘नाथमय’ झाले होते. “हे संमेलन म्हणजे नाथांच्या सेवेची सांगता नसून, गावोगावी ही सेवा पोहोचवण्याची ही तर फक्त सुरुवात आहे . वैनतेय विद्यालयाच्या प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नाथभक्त, दत्तभक्त आणि…