Headlines

MPत 9 दिवसांनंतर मान्सून पुन्हा सक्रिय:यूपीच्या 87 गावांना पुराचा धोका; अरुणाचल प्रदेशात पूर-भूस्खलनाची स्थिती

मध्य प्रदेशमध्ये 9 दिवसांनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारी बालाघाट, उमरिया आणि डिंडोरीमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने बालाघाट आणि डिंडोरीमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे, तर 31 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यात पुढील 3…

Read More

अमरकंद वनस्पतीची तस्करी करणाऱ्या ‎सिल्लोडमधील तिघांना अटक:5 किलो कंद आणि दोन दुचाकी जप्त

सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील डोंगराळ भागातून अत्यंत दुर्मिळ आणि औषधी मानल्या जाणाऱ्या अमरकंद वनस्पतीची बेकायदेशीरपणे तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. गुरुवारी झालेल्या या कारवाईत संशयितांकडून ५ किलो अमरकंद आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. घटांब्री येथील नासेर यासीन पठाण (२९), वाजेद जुम्मा पठाण (३१) आणि शारूख मुस्तफा शेख (३०) अशी…

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक:19.50 कोटींच्या थकीत ऊस बिलासाठी पैठणला जलकुंभावर 13 तास आंदोलन

तालुक्यातील संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीज यांनी २०२५-२६ च्या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १९ कोटी ५० लाखांची एफआरपी थकविल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन शिसोदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून पैठण तहसील कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून १३ तास आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी महसूल प्रशासनाने कारखान्याची जप्ती व लिलाव…

Read More

सायबर चोरी:‘एपीके’ फाइल उघडताच निवृत्त अभियंत्याच्या खात्यातून 24 लाख लंपास

शहरातील महावितरणचे ७० वर्षांचे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. त्यांच्या मोबाइलवर आलेल्या एका संशयास्पद एपीके फाइलवर क्लिक करणे त्यांना अत्यंत महाग पडले. या एका चुकीमुळे सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारत तब्बल २४ लाख ७९ हजार ९८० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. हा प्रकार २५ जून रोजी मध्यरात्री घडला. प्रकरणी १६ जुलै…

Read More

अभिजीत दिपकेचा दावा- वांगचुकवर हल्ल्याचा प्रयत्न झाला:दगड फेकला; 21 व्या दिवशीही उपोषण, हृतिक रोशनचे आंदोलनाला पाठिंबा

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दावा केला आहे की, जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात काही लोकांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, वांगचुक यांच्या दिशेने दगड फेकण्यात आला, परंतु सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दिपके यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये म्हटले – काही…

Read More

सियाच्या हट्टानंतर केतनने लोहगडावर जाण्यास दिली परवानगी:केतनचे वडील विशाल अग्रवाल यांची ‘दिव्य मराठी’शी बोलताना माहिती, तिच्या चेहऱ्यावर कुठलेही दु:ख आम्हाला दिसले नाही

मंगेश फल्ले | पुणे सियाच्या हट्टानंतर केतनने लोहगडावर जाण्यास दिली परवानगी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांची ‘दिव्य मराठी’शी बोलताना माहिती, तिच्या चेहऱ्यावर कुठलेही दु:ख आम्हाला दिसले नाही लाेहगड किल्ल्यावरून १८ जून राेजी ४०० फूट खोल दरीत ढकलून देत व्यावसायिक केतन अग्रवाल याचा खून त्याची नियोजित पत्नी सिया गोयल (२०) व तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२)…

Read More

हिंगोली जिल्ह्यात 2 अपघातांत 3 ठार, एक गंभीर‎:अपघातातील मृतांमध्ये पुसदच्या 2 जिम ट्रेनरचा समावेश‎

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ‎‎अपघातांत तीन जण ठार झाल्याची ‎‎घटना घडली आहे. हिंगोली ते ‎‎कळमनुरी मार्गावर कार अपघातात‎पुसद येथील दोन जिम ट्रेनरचा मृत्यू ‎‎झाला. हिंगोली ते औंढा नागनाथ‎मार्गावर एका पादचाऱ्याचा अज्ञात‎वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची‎घटना घडली आहे. तिघांच्या‎मृतदेहावर हिंगोलीच्या शासकीय‎वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी‎सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात‎आली.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎पुसद येथील परिमल राठोड व त्यांचा‎मित्र उदय गाजरे हे…

Read More

कार्यकर्त्यावर हल्ला; व्हिडिओ कॉलवर ‎नगरसेवक म्हणाला, 'मुंडके घेऊन या'‎:बीड‎मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह 10 जणांवर गुन्हा दाखल‎

शहरातील चांदापूर रोडवरील एका पेट्रोल‎पंपाजवळ राजकीय वैमनस्यातून‎कार्यकर्त्यावर कोयता व लोखंडी रॉडने‎प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली.‎यात कार्यकर्त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय‎फ्रॅक्चर झाले आहेत. डोक्याला गंभीर‎दुखापत झाली. हल्ला सुरू असताना मुख्य‎सूत्रधार नगरसेवकाने थेट व्हिडिओ कॉल‎करून “मुंडके माझ्याकडे घेऊन या,” असा‎आदेश हल्लेखोरांना दिला. याप्रकरणी‎परळी शहर ठाण्यात पीडित अभिजीत‎कांबळे याच्या जबाबावरून परळी शहर‎पोलिसांनी नगरसेवक नितीन रोडे तसेच‎आनंद विलास…

Read More

सायबर फसवणुक:संभाजीनगरमधील बँक खात्यांचा वापर, चौघांवर गुन्हा दाखल

देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सायबर फसवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील ४ बँक खात्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात ४ जणांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात ४ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. अन्य काही जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आवेज मसूद शेख (सादातनगर), सिद्दिकी फराज अहमद रिझवान अहमद (टाइम्स कॉलनी, कटकट गेट), आशिष…

Read More

नीट:देशामध्ये मुलींत प्रथम आलेल्या पुण्याच्या श्रावणीने 2 वर्षे मोबाइलला हात नाही लावला, जि.प. शिक्षक दांपत्याच्या मुलीची झेप

दौंड तालुक्यातील खडकीची श्रावणी कृष्णा कुदळे हिने ‘नीट यूजी-२०२६’ मध्ये ७२० पैकी ७१० गुण मिळवत देशात ५ वा क्रमांक पटकावला आहे. ती देशात मुलींमध्ये पहिली, तर महाराष्ट्रासह ओबीसी प्रवर्गात अव्वल ठरली. यश मिळवण्यासाठी तिने २ वर्षे मोबाइल व सोशल मीडियापासून दुरावा ठेवला आणि मागील १० वर्षे घरात टीव्ही न पाहता कठोर परिश्रम घेतले. श्रावणीचे आई-वडील…

Read More